
अकोला प्रती – नुकतीच भारत जोडो यात्रा बंदोबस्ता कामी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त आटोपुन परत येणाऱ्या सरकारी पोलीस वाहनाला अपघात झाल्याची घटना बाळापुर पातुर रोडवर घडली सुदैवाने प्राणहानी झाली नसून चार पोलीस कर्मचारी व तीन होमगार्ड जखमी झाले आहेत बंदोबस्त कामी असलेले पोलीस कर्मचारी व होमगार्ड एमएच ३० एच ५०६ क्रमांकाच्या सरकारी वाहनाने पातुरकडे जात असताना सदर वाहनाचे टायर फुटून चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हे वाहन दुर्घटनाग्रस्त झाले पोलीस वाहनाने तीन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडले सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही तरीही पोलीस कर्मचाऱ्यांना अत्यंत तातडीने कुठेही जावे लागते त्याकरिता त्यांना योग्य वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी व हे भंगार झालेल्या गाड्या वापरास बंदी घालून या गाड्यांचा लिलाव करण्यात यावा व या भंगार गाड्या हद्दपार करण्यात यावे व नविन गाड्या देण्यात याव्यात अशि मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे, विशाल भोसले, परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्र महासचिव प्रा पंजाबराव सिरसाठ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते