अकोला : अकोल्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत उगवा गावात सलग दोन ठिकाणी धाड टाकून १० हजार रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त झाला. मात्र, दारूबंदी कायद्याच्या धडक कारवायांनंतरही गावोगावी हा व्यवसाय फोफावत आहे, हा मोठा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे.
गुप्त माहितीनुसार १३ ऑगस्ट रोजी पो.स्टे. अकोट फाईल हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दुकानांवर छापा टाकला.
पहिल्या ठिकाणी आरोपी रंजीत गणेश राऊत यांच्या दुकानातून रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की व सखु संत्रा टॅगो प्रिमियम देशी दारू असा ८०००/- रुपयांचा साठा सापडला.
दुसऱ्या ठिकाणी आरोपी रुपेश ज्ञानेश्वर राठोड यांच्या घरासमोरील दुकानातून १९२०/- रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली.
🛑 जनतेचा प्रश्न –
दारूबंदी कायदा लागू असूनही उगवा सारख्या गावात खुलेआम दुकानातून विदेशी व देशी दारूची विक्री कशी होते? हे केवळ छोटे विक्रेतेच की मागे एखादं मोठं जाळं आहे? मोठ्या माशांवर जाळं कधी टाकणार?
🚔 कारवाईत सहभागी –
मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके, पो.उपनि. गोपाल जाधव, विष्णु बोडखे व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अंमलदारांनी ही कारवाई केली.

