उडान बॉक्सिंग अकादमीच्या सोहिलने सुवर्णपदक तर मोहिनने रौप्य पदक जिंकले…

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथील वसंत देसाई मैदानावर राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये सोहिल खेरू रेघीवाले याने १७ वर्षे वयोगटात सुवर्णपदक तर मोहिन खेरू रेघीवाले याने पटकावले. 19 वर्षे वयोगटात रौप्य पदक पटकावले असून सोहिल खेरू रेघीवाले यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शेख फरीद वेलफेअर सोसायटीतर्फे चालवल्या जाणाऱ्या उडान बॉक्सिंग अकादमीचे संचालक शेख एजाज यांच्याकडून ते प्रशिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या पालकांना दिले आहे आणि प्रशिक्षक शेख एजाज सर दिला आहे .सोहील राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत दिल्ली येथे होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.