कमला नेहरू नगर येथून देशी बनावटीचे दोन अग्निशस्त्र व एक जिवंत काडतुस जप्त..

गुन्हे शाखा अकोला पोलीसांची कार्यवाही..

स्थानिक: अकोला,दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील सहा. पोलीस निरीक्षक, कैलास भगत यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, लक्झरी बस स्टॅण्डचे मागे कमला नेहरू नगर अकोला येथे राहणारा यश उर्फ अजय गुलाब धुरीया हा त्याचे घरात अग्नीशस्त्र बाळगुन आहे अशी बातमी मिळाली सदर बातमीचे अनुषंगाने कायदेशिर कार्यवाही बाबत पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थागुशा अकोला यांनी सहा. पोलीस निरीक्षक, कैलास भगत व त्यांचे पथकाकतील अमंलदार यांना मार्गदर्शन करून सुचना देवून कायदेशिर कार्यवाही करण्या करिता कमला नेहरू नगर अकोला येथे खाना केले त्या प्रमाणे पथकातील सहा. पोलीस निरीक्षक, कैलास भगत यांनी त्याचे पथकासह कमला नेहरू नगर अकोला येथे जावुन यश उर्फ अजय गुलाब धुरीया, वय २५ वर्ष, यांचे घराची पंचा समझ कायदेशिर रित्या घरझडती घेतली असता त्यांचे घरात दोन देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतुस एकुण दिगंत ६०,१००/ रु. मिळुन आल्याने दोन्ही अग्नीशस्त्र यश उर्फ अजय गुलाब धुरीया, वय २५ वर्ष, राहणार कमला नेहरू नगर, अकोला यांचे जवळुन जप्त करून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन सिटीकोतवाली अकोला येथे कलम ३,२५ आगे अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद केला.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री. संदिप घुगे, सा जि. अकोला, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. श्री अजय डोंगरे सा, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मागर्दशना खाली सपोनि कैलास भगत, ए.एस.आय. गणेश पांडे, राजपालसिंह ठाकुर पोलीस अमलदार रवि खंडारे अब्दुल माजीद, संतोष दाभाडे, ऐजाज अहमद, अमोल दिपके, बालक पो. कॉ. प्रशांत कमलाकर स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.