पातूर : दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्याने द प्रोफेशनल करिअर बहूउद्देशीय शैक्षणिक संस्थेच्या वतीने प्रतिमेचे हारअर्पण व पूजन करून अभिवादन करण्यात आले. समाज सुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना आज सर्वांनी आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी द प्रोफेशनल करिअर बहूउद्देशीय संस्थेचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे, ग्रामीण युवा संघटनेचे संस्थाध्यक्ष सतीश हातोले,तीक्ष्णगत शाखा पातूर समन्वयक आशिष दाभाडे, अमोल करवते, युवा पत्रकार अविनाश पोहरे,दिनेश काटे, रवि चव्हाण,पवन राठोड,आदी उपस्थित होते.