आज दिनांक १२/०३/२०२४ रोजी चे १७.०० वाजता मा. पोलीस अधीक्षक, श्री. बच्चन सिंह साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयात शांतता अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातुन येणा-या आगामी निवडणुक, रमजान महिना असल्याने पो.स्टे. खदान हद्दीत जवळपास सर्व भागात पथसंचलन (रूट मार्च) घेण्यात आला.
सदरचे पथसंचलन हे खदान, कौलखेड, रिंग रोड मलकापुर, तुकाराम चौक, गौरक्षण रोडवरील वैभव हॉटेल मार्गावरून महाकाली बार, नेहरू पार्क वरून परत पोलीस अधीक्षक कार्यालय असा एकुण ९ कि.मी. पथसंचलन (रूट मार्च) घेण्यात आला.
सदर रुटमार्च मध्ये स्वतः पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, बि.एस.एफ. चे कंपनी कमाइंट श्री विकास चंद्रा, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उप विभाग अकोला श्री. कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी श्री. शंकर शेळके, शहरवाहतुक विभागाचे पोलीस निरिक्षक श्री किनगे, शहर विभागातील सर्व पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उप निरीक्षक दर्जाचे एकुण ३४ अधिकारी तसेच पोलीस मुख्यालय चे राखीव पोलीस निरीक्षक श्री. जुमनाके, राखीव पोलीस उपनिरीक्षक, बि.एस.एफ. कंपनीचे ५५ जवान तसेच १) क्युआरटी चे पथक कमांक ०१ व ०२, २) आरसिपी पथक कमांक ०२,०३ व ०४, ३) बि. एस.एफ. कंपनीचे ५५ कर्मचारी, ४) शहरातील एकुण ३०५ पोलीस अंमलदार, ५) स्थानिक गुन्हे शाखाचे साध्थ्या गणवेषात १० पोलीस अंमलदार व दामीनी पथक हे त्यांचे नविन मिळालेल्या दुचाकीसह सहभाग घेवुन पथसंचलन करण्यात आले.