अकोला दिनांक १२/०७/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. कायदा व सुव्यवस्था हाताळणे करिता दंगा नियंत्रण अत्याधुनिक ‘वज्र’ वाहन पोलीस दलात दाखल झाले. त्याचे उद्घाटन मा. श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक अकोला यांचे हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात आले. सदर चे ‘वज्र’ वाहन यामध्ये दंगल नियंत्रणा करीता अत्याधुनिक साधन सामग्री चा वापर करण्यात आला आहे दंगली मध्ये अनियंत्रीत जमावाला नियंत्रीत करण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्याकामी या वाहनाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये जनरेटर, लाईटींग व्यवस्था असुन फ्लॅश लाईट तसेच, सायरन, इ. ची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता सदरच्या वाहनांचा वापर करण्यात येणार आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस दल नेहमी सतर्क असते त्यासाठी विविध उपाययोजना जसे दंगा काबु योजना, मॉक ड्रील, रूट मार्च इ. असे विविध उपाय योजना राबविल्या जातात. आजच्या अत्याधुनिक युगात पोलीस विभागात सुद्धा वेगवेगळे बदल करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन मा. श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक, अकोला यांनी अकोला जिल्हयातील संवेदनशीलतेचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली प्रशासनाने डी.पी.डी.सी. फंडा मधुन सदर चे दंगल नियंत्रण ‘वज्र’ वाहन पोलीस विभागाकरीता उपलब्ध करून दिले.