तिच्यासाठी आयुष्यापेक्षा महत्त्वाचा ठरला iPhone; नागपुरातील तरुणीचं धक्कादायक पाऊल

नागपूर शहरात आयफोनसाठी एका तरुणीने आत्महत्या केली (Suicide for iPhone). कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही आयफोन घेण्याचं आश्वासन पालकांनी दिलं होतं. मात्र, आयफोन घेण्यास विलंब झाला.

रवी गुलकरी, नागपूर 03 ऑक्टोबर : अनेकदा आत्महत्येच्या अशा घटना समोर येतात ज्याचं कारण जाणून कोणीही थक्क होईल. अगदी लहान गोष्टी किंवा हट्ट पूर्ण न झाल्याने मुलांनी आपलं आयुष्य संपवल्याच्या घटना बऱ्याचदा वाचायला मिळतात. अशीच एक धक्कादायक घटना आता नागपूरमधून समोर आली आहे. ज्यात एका मुलीने आयफोन न मिळाल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे

नागपूर शहरात आयफोनसाठी एका तरुणीने आत्महत्या केली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही आयफोन घेण्याचं आश्वासन पालकांनी दिलं होतं. मात्र, आयफोन घेण्यास विलंब झाला. त्यामुळे मुलीला असं वाटलं की तिचे आई-वडील तिला आयफोन घेऊन देणार नाहीत. यामुळे तिने आत्महत्या केली.

ती जिल्ह्यातील हिंगणा शहरातील रायसोनी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने घरातील बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, मुलीने आपल्या आई-वडिलांना वारंवार आपल्यासाठी आयफोन घेण्यास सांगितलं होतं.

या तरुणीचे आई-वडील गृहउद्योग चालवतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी मुलीच्या आग्रहामुळे तिला आयफोन घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आयफोन घेण्यास विलंब झाला. यामुळे मुलीला वाटलं की तिचे आई-वडील तिच्यासाठी आयफोन विकत घेणार नाहीत. तिला असं वाटलं की पालकांना तिच्यासाठी आयफोन खरेदी करण्याची इच्छा नाही. याच कारणामुळे तिने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.