स्व. संतोष देशमुख (बीड) यांची हत्या करणाऱ्यांना त्वरीत फाशीची शिक्षा द्या..

सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने काढला जन आक्रोश मोर्चा..

प्रतिनिधी : कुणाल मेश्राम

स्थानिक : स्वः संतोष देशमुख (बीड) यांची हत्या करणाऱ्यांना त्वरीत फाशीची शिक्षा व मृतक सोमनाथ सुर्यवंशी परभणी यांना न्याय मिळणेबाबत आकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.
चीड मधील केज तालुक्यातील मरसाजोग गावचे युवा सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्दयीपणे क्रूर हत्या करण्यात आली, त्यांच्या हत्या प्रकरणातील ७ आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरीत गुन्हेगारांना त्वरीत अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व प्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अभय देणारे तात्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा व सर्व सामान्य जनतेचा न्याय व्यवस्था व लोकशाहीवरील विश्वास कायम ठेवावा.

    या मागणीसाठी अकोला जिल्ह्यातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जातीय सामाजिक संघटना व समाज बांधव यांच्यावतीने जन आक्रोश मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून वरील प्रकरणात संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना खालील मागण्या सह न्याय देण्यात यावा. हे नम्र विनंती करिता निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. 

१)स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरीत फाशीची शिक्षा द्यावी व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबियांना न्याय देण्यात यावा.
२) खंडणीतील आरोपीवर स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येचा कायदेशीर रित्या गुन्हा दाखल करण्यात यावा.
३)वाल्मीक कराड याच्यावर वरदहस्त असणाऱ्या राजकीय मंडळीची एस. आय. टी. चौकशी करण्यात यावी.
४)कर्तव्यात कसुर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फे व सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात यावा.
५)स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत यांच्या कुटुंबास व गावास पोलीस संरक्षण देण्यात यावे.
६)स्व. सतीष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबीयांचे पुनर्वसन करण्यात यावे.
७)एस.आय.टी. चौकशी साठी बाहेर जिल्ह्यातील अधिकारी नेमण्यात यावे.
८)निर्भीड व विशेष सरकारी वकीलाची नेमणुक करण्यात यावी.
९)हा न्यायालयीन खटला बीड जिल्ह्याबाहेर व फासस्ट्रॅक न्यायालया द्वारे चालविण्यात यावा.
१०) संतोष देशमुख हत्था प्रकरणाशी संबंधीत आरोपी व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्या.

वरील प्रमुख मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.