ज्येष्ठ साहित्यिका मा.आसावरी काकडे अध्यक्षा तर ज्येष्ठ साहित्यिक मा. भारत सासणे उद्घाटक
नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या जाई फाउंडेशन मुंबई महा. 49/2021 द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंच मुंबईचे तिसरे शब्दवेल साहित्य संमेलन विद्येचे माहेरघर पुणे येथे कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जानेवारी व 22 जानेवारी 2023 रोजी आझम कॅम्पस असेंब्ली हॉल छावणी परिसर पुणे येथे आयोजित करण्यात असल्याची माहिती शब्दवेल साहित्य मंचचे अध्यक्ष प्रविण बोपुलकर यांनी दिली.
विद्येच्या माहेरघरात होत असलेल्या या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिका साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका कवयित्री मा.आसावरी काकडे या अध्यक्षा तर 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. भारत सासणे सर उदघाटक म्हणून लाभणार आहेत आणि स्वागताध्यक्ष पदी कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. पी. ए. इनामदार सर तर प्रमुख अतिथी म्हणून मा.मेहबुब कासार (राज्यकर उपायुक्त GST विभाग,मुंबई) तर समारोपीय सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून मा. पुष्पराज गावंडे (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ)यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी केंद्रिय कार्यकारिणी सहसचिव रामदासजी गायधने,संघटन प्रमुख देवेंद्रजी इंगळकर,शब्दवेल युथ विंग अमोल चरडे, पुणे जिल्हाध्यक्षा विद्या अटक,उपाध्यक्षा नलिनी पवार,तांत्रिक विभाग प्रमुख वैभव वऱ्हाडी उपस्थित होते. या दोन दिवसीय संमेलनात उद्घाटन सोहळा,निमंत्रितांचे कविसंमेलन,परिसंवाद, प्रकट मुलाखत,गझल मुशायरा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा असे दर्जेदार सत्रनिहाय आयोजन करण्यात आले. साहित्यिकांनी जास्तीतजास्त संख्येने संमेलनास उपस्थित राहून दर्जेदार साहित्य मेजवानीचा आस्वाद घेण्याचे आवाहन शब्दवेल साहित्य मंचमार्फत करण्यात आलेले आहे.