प्रा.डॉ.उमेश घोडेस्वार;
अनु.जाती व अनु.जमातीचे आरक्षण हे घटनादत्त असून ते मिळवण्यासाठी डॉ.आंबेडकरांना अनेक अरथडे पार करावे लागलेत.घटना सामितीच्या बैठकांमधे त्यावर अनेक डिबेट होऊन त्याच्या समर्थनार्थ आंबेडकरांना कॉग्रेसच्या अनेक नेत्यांविरूद्ध तोंड द्यावे लागले.अनु.जाती मधे ५९ जातींचा समावेश असून ह्या सर्व जाती वर्णबाह्य आहेत.त्या सर्वांची सामाजिक स्थिती सारखीच असून सर्व जाती अस्पृश्य आहेत.त्यामुळे त्यांच्यात भेद करता येत नाही.त्यांच्या मधे कोणतीही उतरंड नाही.म्हणून त्यांच्यातील उप-वर्गीकण समर्थनीय नाही.ते काल दि.८ सप्टेंबर रोजी आयोजीत 'अनुसूचित जाती व जमाती उप-वार्गीकरण व क्रिमिलेअर : एक विश्लेषण' या विषयावर आयोजीत व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.ते पुढे म्हणाले की,नुकताच २ ऑगस्ट २४ रोजी उच्च न्यायालयाने या वर्गातील उपवर्गीकरण व त्यांच्यातील क्रिमिलेअरला परवानगी देणारा निर्णय दिला.या प्रवर्गातील काही जातींना अधिक लाभ मिळत असून काही जाती ह्या लाभापासून वंचीत राहील्या आहेत.त्यांना लाभ मिळवा म्हणून हा निर्णय देण्यात आल्याचे समजते.मात्र असा निर्णय देतांना या प्रवर्गातील जात निहाय प्राप्त केलेल्या नोकऱ्यांची स्थिती दर्शक कोणतीही अधिकृत आकडेवारी कोर्ट किंवा शासणाकडे नसून तसे कुठलेली सर्वेक्षण आजपर्यंत देशांतर्गत घेण्यात आले नाही.उलट लोकसंख्येच्या प्रमाणात निर्धारित आरक्षीत कोठ्या पेक्षा फार कमी नोकऱ्या या प्रवर्गांना मिळाल्या आहेत. विविध श्रेणीतील त्यांचे नोकऱ्यांचे प्रमाण भिन्न असून उच्च पदांचा अनुशेष बाकी आहे.या साठी त्यांनी नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ.सुखदेव थोरात लिखीत पुस्तकातील आकडेवारीचा संदर्भही दिला.खऱ्या अर्थाने आरक्षणाचा अद्याप पुर्णपणे लाभ मिळाला नसतांना ते संपवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.या अन्यायकारक निर्णया विरुद्ध एकही प्रस्थापित पक्ष किंवा नेता आवाज उठवत नसून केवळ अॅड.बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते यावर व्यक्त होत आहेत.*
*व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन फुले-आंबेडकर विद्वत सभा जिल्हा शाखा अकोला यांच्या कडून करण्यात आले होते.स्थानिक अशोक वाटिका सभागृहात आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी फुले-आंबेडकर विद्वत सभेचे विभागीय समन्वयक आयु.सिध्दार्थ देवदरीकर हे होते.तर आयु.पी.जे.वानखडे साहेब,जिल्हाअध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा,राम शेगोकार चर्मकार समाज सामाजिक कार्यकर्ता,आयु.गजाननभाऊ दांडगे,अध्यक्ष लहूसेना फाऊंडेशन,अकोला हे होते.सर्व प्रमुख पाहुण्यांही आपले मनोगत व्यक्त केले.या प्रवर्गांचे आरक्षण हे गरीबी निर्मुलनासाठी नसून ते सामाजिक समता प्रस्थापीत करण्यासाठी केलेली घटनात्मक व्यवस्था आहे.त्यामुळे समाजात जो पर्यंत जाती व्यवस्था कायम आहे तो पर्यंत आरक्षण संपवता येणार नाही.मात्र मनुवाद्यांनी वेगळ्या मार्गांनी ते संपवण्याचे षडयंत्र रचले आहे.त्यासाठी सर्व समाज एकसंघ राहून त्या विरूद्ध लढा दीला पाहीजे असे पी.जे.वानखडे साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगीतले.तर प्रवर्गातील वंचीत जात समुहाला समानतेची संधी मिळावी.या साठी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचे समर्थ प्राप्त असल्याचे गजानन दांडगे यांनी सांगीतले.आता एकसंघ होण्याची हीच योग्य वेळ असून एकसंघ लढ्यासाठी सर्वानी सज्ज राहावे असे राम शेगोकार म्हणाले.या निर्णयाने काही जाती समुह हूरडून गेले असून निर्णयाची त्वरीत अंमलबजावनीची मागणी करत आहेत.इथले मनुवादी सहज सहज कुणाला काही देतील असे शक्य नाही.हा निर्णय राजकीय प्रेरीत असण्याची शक्यता असल्याने त्या बाबत कोणतीही घाई न करता या निर्णयाचे व्यवस्थीत विश्लेषन करून त्याचे होणारे दुरगामी परिणाम तपासावेत असे आयु.सिध्दार्थ देवदरीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संगीतले.*
*कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते म.फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना हारापर्ण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.संदिप डोंगरे यांनी केले.प्रास्ताविक व प्रमुख वक्त्याचा परिचय जिल्हा समन्वय प्रा.डॉ.संजय पोहरे यांनी करून दिला. आयु. बी.सी.खाडे यांनी आभार व्यक्त केले.*
*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दा.दा.गवई,बी.एस.सोनोने, गणेश गोपनारायन,विनोद खंडारे,निलेश वाहूरवाघ यांनी परिश्रम घेतले.*