स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांच्या कडून एक चारचाकी वाहण व दोन मोटर सायकल चोरी करणा-या आरोपी जेरबंद..

एक टाटा एस व दोन मोटरसायकल असा एकूण ४,००,०००/-रु.चा मुद्देमाल जप्त

अकोला जिल्हयात मोठया प्रमाणात चारचाकी व द्वाकी वाहणे चोरी जाण्याचे प्रकार घडत असल्याने मा, पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना गुन्हा उघडकीस आणुन आरोपी जेरबंद करण्याचे आदेश दिल्या वरून स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा येथील एक तपास पथक नेमुन गुन्हा उघडकीस करणे बाबत सुचना दिल्याने पथकाला दि ०१/०१/२०२४ रोजी गोपणीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमी वरून चारचाकी मालवाहू वाहण चोरी करणारे संशयीत इसम १) शेख इरशाद शेख आझाद वय २८ वर्ष रा हमजा प्लॉट, जुनेशहर अकोला,, २) मोहम्मद समीर अन्सारी मोहम्मद शरीफ अन्सारी वय २४ वर्ष रा मेहबुबु शाह तकीया लालीज रकुल मोमीन पुरा, नागपुर यांना ताब्यात घेवून कसुन विचारपुस केली असता त्यांनी पो.स्टे. रामदास पेठ अप न ४८७/२०२४ कलम ३७९ भादवी मधील चोरी गेलेली एक TATA कंपनीची ACE MEGA XL चार चाकी मालवाहू वाहण क MH-02-ER-1847 ची किंमत अंदाजे ३,००,०००/- रूपये किंमतीबी चार चाकी मालवाहु वाहण चोरल्याचे निष्पण झाल्याने सदर वाहण जप्त करून आरोपी, मुददेमाल सह पुढील तपास कामी पोस्टे रामदास पेठ यांच्या ताब्यात देण्यात आले.

तसेच आरोपी नागे आदीत्य गजानन ठाकरे वय २४ वर्ष रा सातेगाव ता अर्जनगाव सुर्जी जि अमरातवती ह.मु. न्यु खेतान नगर कौलखेड, अकोला यास ताब्यात घेदन विचारपूस केली असता त्याने पो स्टे सिटी कोतवाली येथील अप क २४८/२३ कलम ३७९ भादवी मधील चोरी गेलेली काळया रंगाची स्प्लेन्डर प्रो जिचा कMH-30-AK-3701 की अं ५०,०००/- रूच पो स्टे अकोट शहर येथील अप क ४२१/२३ कलम ३७९ भादवी मधील एक काळया रंगाची हिरो स्प्लेन्डर प्लस मोसा जिचा क. MH-30-BE-5629 की अं ५०,००० /- रू चोरी केल्याचे कबुली दिल्याने आरोपी कहुन दोन मोसा की अं १,००,०००/-रू जप्त करून आरोपी पुढील तपास कामी पो स्टे सिटी कोतवाली यांचे ताब्यात देण्यात आले.

वरील नमुद आरोपीता कडुन एक मालवाहू चारचाकी वाहन टाटा एस व दोन मोटार सायकल की अं ४,००,०००/- रू. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री अभय डोगरे यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला. व सपोनि कैलास भगत, पोउपनि, गोपाल जाधव ए. एस. आय. दशरथ बोरकर, पोहवा फिरोज खान, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, नापोका, खुशाल नेमाडे, वसीमोददीन, पो. कॉ, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभीषेक पाटक, मोहम्मद आमीर, लिलाधर खंडारे, अन्सार अहमद, उदय शुक्ला, स्वप्नील चौधरी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.