फिर्यादी श्रीमती. सुशीला. ब्रिजलाल. झुनझुनवाला, वयः ७०, वर्ष, रा. अमृत हाउसींग सोसायटी, सातव चौक अकोला. यांनी जबानी रीपोर्ट दिला की, दिनांक ०२/०३/२४ रोजी सायकाळी १८/४५ वा. चे सुमारास तीचे दोन मैत्रीणी यांचेसह नेहमी प्रमाणे सातव चौक ते रेल्वे कॉलनी या परीसरात पायी फिरत असतांना एक तीन चाकी सवारी अॅटो ने येवुन दोन अनोळखी इसम खाली उतरले व त्यांनी फिर्यादीची हातातील पर्स ज्यामध्ये १५७००/रु चा मुददेमाल जबरी ने चोरुन नेला अश्या फिर्यादी चे जबानी रीपोर्ट वरुन सदरचा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.
सदरचा गुन्हयाचा तपासमध्ये आरोपी १) कार्तिक योगेश लाखे वय २१ वर्ष रा. रमेश नगर, डाबकी रोड, पावर हाउस जवळ अकोला (२) गणेश गोपाल नावकार वय २१ वर्ष रा. विर लहुजी वस्ताद नगर खोलेश्वर अकोला यांना अटक करुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी पोस्टे रामदासपेठ अप.न.१३१/२४ कलम ३९२,३४ भादवी मधील गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच पोलीस स्टेशन सिव्हील लाईन अप.न. अप.न.१६१/२४ कलम ३७९ भादवी चोरी केल्याची कबुली देवुन सदर गुन्हयातील आरोपीतांकडुन एक रीयल मी कंपणीचा मोबाईल फोन कि.अ. १५०००/रु एक तीन चाकी सवारी अॅटो कि.अ.१,००,०००/रु व ४० नग सोन्याचे मनी व एक सोन्याचे पेंडाल एकुण वजन ५.८४० ग्रॅम कि.अ. ३३७७० /रु असा एकुण १,४८,७७०/रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगीरी श्री बच्चन सिंग पोलीस अधिक्षक अकोला, श्री अभय डोंगरे अपर पालीस अधिक्षक, श्री सतिष कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री मनोज बहुरे यांचे मार्ग दर्शनाखली सपोनि के. डी. पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड, सपोउपनि सदाशिव सुळकर, पोहवा शेख हसन शेख अब्दुल्ला, तौहीद अली काझी, पो. कॉ. श्याम मोहळे, अतुल बावणे म.पो.कॉ. माधुरी लाहोळे सर्व नेमणुक रामदापेठ, अकोला यांनी केलेला