खरेदी-विक्री सोसायटीच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय..

पातूर- शेतकरी खरेदी विक्री व प्रक्रिया सोसायटीच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला असून प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व सदस्य मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे.पातुर शेतकरी खरेदी विक्री व प्रक्रिया सोसायटीच्या सहसंचालकपदी गुरुवारी निवडणूक पार पडली व सायंकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

यामध्ये सहकार पॅनलचा दणदणी विजय झाला आहे. सेवा सहकारी सोसायटीमधून अबुल खा युसूफ खा,पंजाबराव देशमुख,सुरेश पाकदुणे,मधुकर राठोड, आजाबराव लाहोळे,वैयक्तिक मतदार संघातून विद्यमान अध्यक्ष अरुण कचाले,गजानन ताले व इतर मागासवर्ग मतदार संघातून श्रीकांत ताले हे विजयी झाले. यावेळी हिदायत खान,गुड्डू पहेलवान,मो.मेहताब,अनिक पटेल,शाकीर भाई,निखिल उपर्वट,व सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.