पोलीस अंमलदार यांचे शासकीय कामात अळथळा निमार्ण करणा-या ०८ आरोपीतांना गुन्हयात अटक करण्यात आली

पो.स्टे. रामदासपेठ, अकोला येथील पोलीस अंमलदार हे दि २३/११/२०२४ रोजी त्याचे कर्तव्य बजावत असतांना नमुद आरोपीतांनी संगणमत करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता त्याबाबत तात्काळ पो स्टे रामदासपेठ, अकोला येथे फिर्यादी च्या जबाणी रिपोर्ट वरून अप. क ४०६/२०२४ कलम १३२, ३ (५) बि.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

नमुद गुन्हयाच्या तपासात घटनास्थळावरील व्हिडीओची पाहणी केली असता सदर घटनेत ०५ पेक्षा जास्त आरोपीतांचा सहभाग निष्पन्न होत असुन आरोपीतानी बेकायदेशीर जमाव जमवुन सामाहीक इरादयाने फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने नमुद गुन्हयात कलम १८९(२), १८९(३) (५),१९१(२),१९० बि.एन.एस सहकलम १३५ मपोकों प्रमाणे वाढ करण्यात आली आहे.

नमुद गुन्हयातील आरोपीतांना गुन्हयात अटक करणे कामी पोस्टे स्तरावर वेगवेगळे पथक तयार करून घटनास्थळावरील सि.सि.टी.व्ही व गोपनीय बातमीदारच्या मदतीने नमुद गुन्हयातील ०८ आरोपीतांना २४ तासांच्या आत गुन्हयात आरोपी नामे १) तौफीक खान शब्बीर खान वय ३४ वर्ष रा. संजय नगर मोहम्मदीया मस्जीद जवळ नायगाव अकोला २) मोहम्मद अबुबखर रफीक कुरेशी वय २५ वर्ष रा. कागजीपुरा अकोला ३) मोहम्मद आदील खत्री मोहम्मद अख्तर खत्री वय २७ वर्ष रा. कागजीपुरा अकोला ४) इरशाद हुसेन लियाकत हुसेन वय ३० वर्ष रा. इनामपुरा अकोला ५) अब्दुल सादीक अब्दुल बशीर वय ३२ वर्ष रा. संजय नगर इक्बाल कॉलनी अकोला ६) अजीम खान इकबाल खान वय ३२ वर्ष रा. लाल साहेब चौक काळी मस्जीद जवळ, अकोला ७) जावेद खान जिलानी खान वय २९ वर्ष रा. भारत नगर अकोट फाईल अकोला ८) सैयद अशरफ सैयद मकसूद वय ७० वर्ष रा. अल्लु पहेलवान याचे घरा जवळ नवाबपुरा अकोला यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्हयाच्या तपासात घटनास्थळावरील व्हिडीओ फुटेज पळताळणी करून गुन्हयात आणखी आरोपी निष्पन्न होणार आहेत तसेच कायदे मोडणा-यांच्या विरूध्द अकोला पोलीसांची कडक कार्यवाही सुरू राहणार आहे करीता कोणीही कायदयाचे उल्लघंण करू नये.

सदरची कार्यवाही ही मा. श्री बच्चन सिंग पोलिस अधीक्षक सा. अकोला, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे सा., श्री सतिष कुलकर्णी सा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, सपोनि गणेश नावकर, पोउपनि प्रदिप जोगंदड, निलेश गायकवाड, सुरेश मोरे, पोहवा शेख हसन शेख अब्दुल्ला, दादाराव टापरे, किशोर गवळी, संतोष गवई, विजय सावदेकर, गितेश कांबळे, जगदीश इंगळे, संजय भगत, पोकॉ श्याम मोहळे, अनिल धनभर, रोशन पटले, आकाश जामोदे, अमोल शिरसाट, अतुल बावणे, दिनकर चौधरी विलास साबे, सुमित पाली, कांताराम तांबळे, मपोका वर्षा पाथळे सर्व पोस्टे रामदासपेठ, अकोला यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.