

अखेर १६ दिवसानंतर पिंजर येथील ०७ वर्ष वयाच्या मुलाचा हत्येचा क्लिष्ट गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखे कडुन उलगडा
दिनांक १९/१२/२०२३ रोजी हरवलेला मुलगा नामे शेख अफ्फान शेख अय्युब, वय ०७ वर्ष, रा. बागवान पुरा पिंजर ता. बार्शिटाकळी जि. अकोला याचा मृतदेह स्थानिक गुन्हे शाखा अकोला, श्वान पथक व पो.स्टे. पिंजर येथील पोलीस तसेच संत गाडगेबाबा आपातकालीन पथक पिंजर यांचे १२ दिवसांचे अथक प्रयत्नाने पिंजर अकोला रोडवरील विहरीत सापडला. त्यानंतर सदर गुन्हयाचे तपासात वैद्यकिय अहवालावरून मयाताचा गळा आवळुन खुन झाल्याचा अभिप्राय प्राप्त झाल्याने सदर घटनेविषयी मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखा व ठाणेदार पिंजर यांची बैठक घेवुन महत्वाचे मार्गदर्शन करून गुन्हा उघडकिस आणणेबाबत महत्वाच्या सुचना दिल्या होत्या.
सदर घटनेचे गांभिर्य ओळखुन आज दिनांक ०४/०१/२०२४ रोजी अकोला जिल्हयात नव्याने रूजु झालेले पोलीस अधिक्षक मा. श्री. बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक मा. अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तिजापुर मा. मनोहर दाभाडे, स्थानिक गुन्हे शाखा अकोला प्रमुख पोलीस निरिक्षक मा. शंकर शेळके, पो.उप. नि. गोपाल जाधव व पोलीस स्टेशन पिंजर चे ठाणेदार स.पो.नि. राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली असता मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी तपासाबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
त्यानंतर सतत गेल्या १५ दिवसापासुन स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने केलेल्या विचारपुस, तांत्रीक माहिती
व पोलीस अधिक्षक अकोला मा. श्री बच्चन सिंह यांचे महत्वाचे मार्गदर्शनावरून सदर गुन्हयातील संशयीत यांना
ताब्यात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथे आणुन सखोल विचारपुस केली असता मयत शेख अफ्फान शेख
अय्युब वय ०७ वर्ष याचा खुन त्याचा चुलत भाऊ विधी संघर्षीत बालक वय १७ वर्ष याने केल्याची कबुली दिल्याने
सदर क्लिष्ट प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले.
अश्या प्रकारे लहान बालकाचा खुन करणारा संशयित हा जवळचाच नातेवाईक असल्याने तसेच त्या बालकास मारण्याबाबत ठोस उद्देश / कारण नसल्याने सदर गुन्हा उघडकिस आणण्याचे पोलीसांसमोर आव्हान होते. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री अभय डोंगरे
यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, राजपालसिंह ठाकुर, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, फिरोज खान, रवि खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोददीन, महेद्रं जलीये, अविनाश पाचपोर, खुशाल नेमाडे, लिलाधर खंडार, शेख अन्सार, एजाज अहेमद, आकाश मानकर, धिरज वानखडे, उदय शुक्ला, स्वप्निल बौधरी, मोहम्मद आगोर, अभिषेक पाठक, चालक शेख नफीस, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, अनिल राठोड व तांत्रिक विश्लेषक राहुल गायकवाड, गोपाल ठोंबरे, आशिष आमले, यांनी केली.