
अकोला प्रतिनिधी: शहरातील आगामी सणव उत्सव पाहता कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निमार्ण होवु नये तसेच विवीध प्रकारचे गुन्हे करणा-या गुन्हेगारी वृत्तीचे ईसमांवर कायदयाचा धाक राहावा याकरीता पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह, अपपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन शहरातील १) जावेद खॉन युनुस खॉन रा. कैलास टेकडी, जेतवन नगर पो.स्टे. खदान (०६ महिने हद्दार कालावधी), २) विक्की उर्फ विवेक सुनिल शिंदे रा. गायत्री नगर, मोठी उमरी, अकोला पो. स्टे. सिव्हील लाईन (०६ महिने हद्दार कालावधी), ३) नमो राजाराम तायडे रा. नविन प्लॉट, ग्राम उगवा ता जि. अकोला पो.स्टे. अकोट फाईल (०३ महिने हद्दार कालावधी) या आरोपीविरुध्द दाखल गुन्हयांचा स्वरूप पाहता त्यांचेविरूध्द कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनीयमान्वये अकोला जिल्हयातुन हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी, अकोला यांचेकडे सादर करण्यात आले होते.
त्यानुसार उपविभागीय दंडधिकारी अकोला यांचे आदेशान्वये उपरोक्त ०३ गुन्हेगार प्रवृत्तीचे ईसमांना अकोला व बाळापुर तालुक्यातुन ०३ व ०६ महिने कालावधी करीता हद्दपार करण्यात आले आहे.
अकोला जिल्हा पोलीस प्रशासनकडुन कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी यासाठी कारवाईस न जुमानणा-या सराईत आरोपी विरूध्द प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरू आहे.