
अकोला:
दि.०२/०८/२३ रोजी फिर्यादी नामे निवृत्ती महादेव बोले वय २५ वर्ष रा. ग्राम कान्हेरी सरप याने पो.स्टे पिंजर ला रिपोर्ट दिला होता की, फिर्यादी हा दि.०२/०८/२०२३ रोजी त्याने उसनवारी घेतलेले ३२,५००/- रु. मित्राला परत करण्यासाठी त्याचे मोटार सायकलने कान्हेरी सरप येथून पिंजर मार्ग मुर्तीजापूर येथे जात असतांना दुपारी ११/३० वा.ते १२ / ३० वा. चे दरम्यान दोनद बु. आणि दोनद खुर्द या गावचे रोडवरील पुर्णा नदीचे पुलावर एका अनोळखी इसमाने त्यास हात दाखवून थांबुन त्याचेकडे मोबाईल नसल्याचे सांगुन फोन लावण्याकरीता फिर्यादीस मोबाईल ची मागणी करून फिर्यादी चे मोबाईल वरून दोन मोबाईल क्रमांकावर फोन करून फिर्यादीस बोलण्यात गुंतवुन त्याचे खिसात हात घालून त्याचे कडे असलेले ३२,५००/- रु जबरीने हिसकावुन पळुन गेला अशा फिर्याद वरून पोलिस स्टेशन पिंजर येथे अनोळखी आरोपी विरुद्ध कलम ३९२ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक, श्री. संदीप घुगे साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्या संबधाने मार्गदर्शक सुचना दिल्याने पोलिस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा, श्री. शंकर शेळके यांना घटनेची हकीकत पाहून तकारी मध्ये अनोखळी आरोपीने फिर्यादीचे मोबाईल वरून दोन मोबाईल क्रमांकावर फोन करून जबरी चोरी केल्याची बाब संशयास्पद वाटत असल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सुचना देवुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत दिलेल्या सुचना प्रमाणे गुन्हयातील फिर्यादी यास समक्ष भेटुन त्यास घटने बाबत सविस्तर बारकाईने विचारपुस केली असता त्याचे सांगण्यामध्ये तफावत येत असल्याने तसेच घटनास्थळा चे आजुबाजुला सुध्दा लोकांनी विचारपूस केली असता जबरी चोरी झाल्याचा प्रकार दिसून आला नाही, तेव्हा तांत्रिक व गोपनिय माहीतीच्या आधारे फिर्यादी यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता फिर्यादी हयाने कबुल केले की त्याने दिलेला रिपोर्ट खोटा दिला असुन, सदर रक्कम ही त्याने स्वताच्या फायद्या करीता ईतर ठिकाणी खर्च केल्याचे कबुली दिली. तसेच सदर बाब लपविण्यासाठी त्याने पोलीस स्टेशन पिंजर येथे जबरी चोरीचा खोटा रिपोर्ट दिल्याचे सांगितले.
सदर गुन्हयात फिर्यादीचा जबाब नोंदवून प्रकरणात पुढील कायदेशीरकार्यवाही करण्या बाबत पो.स्टे पिंजर येथे आदेशीत केले आहे.. सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. संदिप घुगे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. शंकर शेळके साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि मुकुंद देशमुख, पोउपनि गोपाल जाधव, पो. ना महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, विशाल मोरे चालक पोना प्रशांत कमलाकर यांनी केली आहे.