अकोल्यात गुन्हेगारांची हिम्मत वाढली सर्व लोकांसमोर व्यापाऱ्याचे अपहरण माहिती देणाऱ्यास पोलीस विभागाकडून 25 हजाराचे बक्षीस जाहीर

पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला अंतर्गत येणारे चार जिन दगडी पुलाजवळील काचेच्या बॉटल विकत घेणारे व्यापारी नामे अरुणकुमार मगनलाल वोरा रा. राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ, अकोला हे दिनांक १३.०५/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०९.०० ते ०९.३० वा. चे सुमारास त्यांचे वार जिन दगडी पुल जवळील गोडावून बंद करून घरी जाण्यासाठी त्यांची मोपेड गाडी उभी करण्याचे ठिकाणी गेले असता त्यांना २ ते ३ अनोळखी ईसमांनी जबरदस्तीने ओढत नेवुन एक जुनी पांढ-या रंगाचे कार मध्ये जबरदस्ती कोर्बुन घेवुन गेले आहेत.

अरूणकुमार मगनलाल वोरा यांचे वर्णनः-

त्यांनी अंगात हिरवा आणि पांढ-या रंगाच्या पटटया असलेले टि शर्ट व किम रंगाची पॅन्ट परीधान केलेली होती त्यांची उंची-०५ फुट ०८ इंच, वर्ण-गोरा व शरिरबाधा मजबुत आहे.

गाडीचे वर्णनः- एक जुनी पांढ-या रंगाची मारोती ८००/अल्टो/झेन कार

वर नमुद वर्णनाच्या व्यक्ती बाबत जे व्यक्ती पोलीसांना माहिती देतील त्यांना मा. पोलीस अधिक्षक साहेब अकोला यांचे मान्यतेने २५,००० रूपयाचे बक्षीस देण्यात येईल तसेच त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

संपर्क:- १) पोलीस स्टेशन रामदासपेठ संपर्क नंबर- ०७२४-२४११३२४

२) उपविभागीय पोलीस अधिकारी सा शहर विभाग अकोला मो.नं- ९१३०५८३०२४ ३) पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला मो. नं ९९२१०३८१११

४) पोलीस निरीक्षक पोस्टे रामदासपेठ मो. नं-९७०२९६६४६४

५) सहा. पोलीस निरीक्षक पोस्टे रामदासपेठ मो.नं ९८२३४६१७९०

Leave a Reply

Your email address will not be published.