बाळापुर… भारताचे संविधान हे सामान्य लोकांचे कवच आहे. या संविधानासमोर गरीब, श्रीमंत आणि स्त्री, पुरुष सर्वसामान आहे. देशातील एक शक्ती संविधानावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे, संविधान बदलले तर देश शंभर वर्षे मागे जाईल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकरांनी केले.
बाळापूर तालुक्यातील भरतपूर येथे कॉर्नर संवाद बैठकित त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, ‘जाती ही निसर्गाने निर्माण केली नाही. ती माणसाने केली.
संविधानाने आपल्या जातीपाती नष्ट केल्या, सर्वांना समान संधी दिली, स्त्री असो वा पुरुष सर्व संविधानासामोर समान आहेत.
जर भारतीय संविधान बदल्या गेले तर आपण 100 वर्ष मागे जाऊ, हे होऊ न देण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. आतापर्यंत संविधानाने आपले रक्षण केले आज आपल्याला संविधानाचे रक्षण केले पाहिजे.
त्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले .
शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, तात्काळ नुकसान भरपाई जाग्यावर देवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे म्हणाले की, सामान्य माणसाला सरपंच पासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, बनवण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
तसेच पुष्पाताई इंगळे,प्रभाताई सिरसाठ ता.अध्यक्ष जानकीराम खारोडे, महासचिव चंद्रकात पाटील, माजी सभापती सोनटक्के ताई, रूपालीताई गवई, मायाताई लोथ, राजेंद्र घुगरे, सुमेध अंभोरे तसेच गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्तिथ होते…

