अंध महिलांच्या मेळाव्याचे आयोजनाकरीता वस्तु किंवा आर्थिक स्वरुपात सहकार्य करावे राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे आवाहन

राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा अमरावती हि गेल्या ५० वर्षापासून अंधांची विविध उपक्रम राबवून अविरतपणे सेवा करीत आहे. जसे रोजगार, स्वयं रोजगार, शिक्षण, प्रशिक्षण, पुर्नवसन व सामाजिक जनजागृती.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. १५ व १६’ मार्च २०२५ रोजी अकोला येथे अंध महिलांकरीता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील किमान २०० अंध महिला सहभागी होत आहेत. त्यांच्या निवास, भोजन व चहा-नाश्त्याची दोन दिवसाची व्यवस्था समाजाच्या आर्थिक सहाय्यामधून करायची आहे. तेव्हा सामाजातील दान-दाते, छोटे-मोठे व्यवसायीक, उद्योगपती, बँका, क्लब व मंडळे यांनी अंध महिलांच्या कार्यक्रमाकरीता सढळ हस्ते सहकार्य करावे. या कार्यक्रमाचा संपूर्ण अंदाजित खर्च १,५३,६००/- इतका अपेक्षीत आहे. करीता संघटना आपणांस नम्र आर्थिक आवाहन करते की, अंध महिलांचा दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता बस्तु किंवा आर्थिक स्वरुपात सढळ हस्ते सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य करावे हि नम्र विनंती तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.