क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून साजरी

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपूर आणि समाज समता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सिनाळा येथील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्याना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करून सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन कु. नभ मंडलवार या विद्यार्थीनीने केले तर आभार सौ. रेखा केसकर मॅडम यांनी मानले.शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला समाज समता संघाचे विदर्भ अध्यक्ष इंजी. नरेंद्र डोंगरे, विचारज्योत फाऊंडेशन संस्थेचे सचिव मुन्ना तावाडे, आमचे मित्र प्रलय म्हशाखेत्री, शुभम जुमडे, सोबतच सिनाळा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निती रामटेके मॅडम, श्री. प्रफुल दयालवार सर, सौ. रेखा केसकर मॅडम, सौ. अल्का चौधरी मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. माधुरी मुनघाटे मॅडम, ग्रामपंचायत सदस्या सौ. आम्रपाली रत्नपारखी मॅडम आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम म्हशाखेत्री काकाजी यांचे सहकार्य लाभले..

Leave a Reply

Your email address will not be published.