बुलढाणा:
पो.स्टे, जळगाव जामोद ( खामगाव, बुलडाणा) येथे राहणार एका महिलेने ०७/०७/२०२३ रोजी पो.स्टे. ला तक्रार दिली होती की, त्यांची मुलगी वय १६ वर्षे, हि ०४/०७/२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास केक आनण्याकरीता जातो म्हणुन घरातुन निघुन गेली व बराच वेळ झाला असतांना सुध्दा ति परत न आल्याने आजु-बाजुला विचारपुस केली असता तिची लहान मुलगी मिळुन आली नाही. रात्री अंदाजे ७ च्या सुमारास महिलेला माहित पडले की, तिची मुलगी गणेश जाधव यांच्या घरात आहे. त्यावेळेस तिथे जावुन शोध घेतला असता लहान मुलीने सांगितले की, ती केक आनण्याकरीता जात असतांना संगिता जाधव हिने आवाज दिल्याने ती तिच्या घरात गेली व तिथे आरोपी हजर होता व त्यावेळेस आरोपी सागर सुरेश कच्छवे याने मुलीला सांगितले की, आपण दोघे पळुन जावुन लग्न करू व लहान मुलीने नाही म्हटले असतास आरोपीने हात पकडला व तु जावु नकोस थांब असे म्हणाला व त्यावेळेस धमकी दिली की, लग्न केले नाहीतर तो लहान मुलीला जिवाने मारुन टाकणार व त्यावेळेस आरडा ओरड केल्याने मुलीचे नातेवाईक तिथे आले व मुलीला सोडवले. अश्या तक्रारीवरुन आरोपी सागर कच्छवे याच्या विरुध्द पो.स्टे. जळगाव जामोद येथे भा. द. वी च्या कलम ३५४, ३५४ अ, ५०६ व बालकाचे लैंगीक अपराधा पासून संरक्षण अधिनियमच्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी सागर कच्छवे याने ॲड. पप्पु मोरवाल यांच्या मार्फत विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, खामगांव येथे अटकपूर्व जामीन मिळण्याकरीता जामीन अर्ज दाखल केले होते. आरोपीतर्फे ॲड. पप्पु मोरवाल यांनी युक्तीवाद केला की, आरोपीला खोट्या तक्रारीच्या आधारे जुन्या वादापोटी फसविण्यात आलेले आहे व तक्रार उशीरा दाखल केलेली आहे व तसेच आरोपी हा जळगाव खानदेश येथील रहिवासी असल्यामुळे साक्षदारांवर दबाव आनण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबींस सरकारी वकील यांनी विरोध केला व सदरहू गुन्हा हा लहान मुलीबदद्ल असल्याने भितीचे वातावरण झालेले आहे व आरोपीला जामीन दिल्यास समाजामध्ये चुकीचे गैरसमज होईल व महिला वर्गामध्ये असंतोषाची भावना निर्माण होवुन इतर लोक सुध्दा अश्याप्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता नाकरता येत नाही व पिडीत व फिर्यादी यांचे कलम १६४ जा.फौ. चे मा. कोर्टाचे बयान बाकी आहे असे सांगितले. त्यावेळेस विद्यमान न्यायालयाने आरोपीतर्फे ॲड. पप्पु मोरवाल यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर केले. त्यावेळेस त्यांना ॲड. झाडोकार, ॲड. राहुल सोनी, ॲड. प्रविण तायडे, ॲड. अक्षय दामोदर व विधी विधार्थी गणेश खेडकर, सौरभ डाहाके, कश्यप अहिर, प्रमेय भोसले, राधेश्याम अवारे, सृष्टी ठाकरे, मिताली लखवानी, रुषीकेश संजय, रुतीक मलीये, सुनिल सरदार, अमीत लोढम इत्यादीने सहकार्य केले.