
अल्पवयीन मुलीचा नियमित पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपीचा विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधीश श्री डोके साहेब, यांच्या न्यायालयाने आरोपी रोहित संजय रायबोले यास जामीन मंजूर केला.थोडक्यात हकीकत अशी आहे की, दिनांक 17 /12/ 2024 रोजी प्रकरणातील फिर्यादीने फिर्याद दिली की, मी माझे वरील ठिकाणी कुटुंबासह राहते व शेतमजुरीचे काम करते. मला एक मुलगा एक मुलगी असून माझ्या मुलीची शाळा सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत राहते व मुलगी दररोज शाळेत एकटी पायदळ जाणे येणे करते. माझे गावात रोहित संजय रायबोले हा राहत असून तो माझ्या घराचे मागे त्याच्या कुटुंबासह राहतो. व मी त्याला ओळखते. आज दिनांक 17/ 12/ 2024 रोजी सकाळी माझी मुलगी म्हणजे पिडीता नेहमीप्रमाणे सकाळी 10.30 वाजता घरातून शाळेत पायदळ गेली त्यानंतर 11 वाजता सुमारास माझा पुतण्या तिला परत घरी घेऊन आला त्यावेळी माझ्या मुलीने मला सांगितले की, आपल्या गावातील रोहित रायबोले हा मागील एका महिन्यापासून मला शाळेत जात येताना त्रास देतो व माझे मागे मागे येऊन मला म्हणतो की मी तुझ्यावर प्रेम करतो. असे वारंवार म्हणतो. मी त्याला परत तू माझे मागे मागे येऊ नको मला ह्या गोष्टी आवडत नाही,मी तुझे नाव माझे घरी सांगून देईल. असे म्हटले त्यावेळी पण त्याने मला तू घरी सांगून पहा मग मी काय करतो अशी धमकी दिली होती. रोहित रायबोले हा मला नेहमी त्रास देत असल्यामुळे मी आज शाळेत जात असताना अंकुश दादाला ही गोष्ट सांगितली होती त्यामुळे अंकुश दादांनी मला सांगितले होते की तू पुढे जा मी रोहित रायबोलेच्या मागे मागे त्याच्यावर लक्ष ठेवून राहतो. असे म्हणून अंकुश दादा मोटर सायकलने रोहितच्या मागे गेला. मी पुढे शाळेत जात असताना रोहित रायबोले हा माझ्या पुढे मोटर सायकलने गेला त्यानंतर मी पायदळ म्हैसपूर भामोदच्या मधात पोहोचली असताना रोहित रायबोले हा माझ्यासमोर आला व मला त्यांनी सांगितले की, छ**** तू मला गावात भेट असे म्हटले त्याचवेळी अंकुश दादा रोहितच्या मागेच पोहोचला त्याच वेळी अंकुश दादाने त्याला पकडले त्यावेळी अंकुशने रोहितला विचारले की, तू माझे बहिणीला त्रास का देत आहेस असे म्हटले त्यावेळी त्यांने अंकुश दादाला लोटलाट केली म्हणून अंकुश दादा ने दोन चापटा मारल्या त्यावेळी रोहित तेथून मोटरसायकलने पळून गेला. त्यानंतर मी शाळेत गेली त्यानंतर माझा भाऊ अंकुश दादा हा मला शाळेत घ्यायला आला व मी त्याच्यासोबत शाळेतून घरी परत आली. असे माझे मुलीने मला सांगितले त्याच वेळी माझे पती घरी आले व त्यांना घडलेले सर्व घटना सांगितली त्यानंतर आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यासाठी आलो आहे.
माझी मुलगी ही एकटीच पायदळ जात असते त्यामुळे रोहित हा माझे मुलीला काहीही करू शकतो. माझे मूलीला त्याच्यापासून धोका आहे. रोहित रायबोले याच्यावर कारवाई करता रिपोर्ट देत आहे. अशा फिर्याद पोलीस स्टेशन येवदा यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा 375/2024 कलम 78 (1)(i)(2), 79,296,352,351(2),351(3) बीएनएस सहकलम 11,12 पोस्को ॲक्ट गुन्ह्याची आरोपी विरुद्ध नोंद करण्यात आली. व त्यानंतर दिनांक 18/ 12/ 2024 रोजी आरोपीला अटक करून आरोपीला न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले.विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब अचलपूर यांच्या न्यायालयाने सरकार पक्ष, फिर्यादी व आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला आरोपीच्या वतीने अँड भुषण घनबहादुर यांनी कामकाज पाहिले.