
अकोला प्रतिनिधी:मिलीदं ज्ञानेश्वर पांडव वय ४३ वर्षे व्यवसाय मेडीकल चालक रा. सदगुरू पार्क अपार्टमेंन्ट जवाहर नगर अकोला यांनी पोस्टेला येवुन जबानी रीपोर्ट दिला की, दिनांक १३/०८/२०२४ रोजी रात्री त्यांचे मालकीचे मेड फोर यु मेडीकल स्टोअर्स भांभुरकर हॉस्पीटल जवळ तापडीया नगर अकोला मध्ये कोणी तरी अज्ञात व्यक्तीने मेडीकल स्टोअर्सच्या मागे असलेल्या ऑफीसचे शटरचे कान कापुन आत प्रवेश करून ऑफीसमध्ये ठेवलेल्या लॅपटॉप बॅगमध्ये असलेली नगदी रक्कम ३,३६,००० रू, लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप किंमत २०,००० रू व चिल्लर १०,००० असे एकुण ३,६६,००० रू ची कोणीतरी चोरून नेले अशा फिच्या रिपोर्ट वरून अप.क ३०७/२४ कलम
३३१ (४), ३०५ भारतीय न्याय संहिता २०२३ गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील पोहवा पोहवा
हसन ब.नं ४३८, टापरे ब.नं १२३५, व पोकॉ श्याम ब.नं २१५७ यांनी तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या आधारे रेकोर्ड वरील आरोपी नामे गजानन नरसींग डाबेराव वय ६६ वर्षे रा. पळसोबडे ता.जि. अकोला यास वलगांव ता.जि. अमरावती येथुन ताब्यात घेवुन कसुन चौकशी केली असता त्यांने गुन्हयाची कबुली देवुन आरोपी कडुन गुन्हयातील चोरी गेलेल्या रक्कमे पैकी ९००००/रु हस्तगत करुन नमुद घरफोडीचा गुन्हा काही तासात उघडकीस आणला आहे.
सदरची कामगीरी श्री बच्चन सिंग पोलीस अधिक्षक अकोला, श्री अभय डोंगरे अप्पर पोलीस अधिक्षक, श्री सतिष कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला, श्री पो.नि. मनोज बहुरे यांचे मार्ग दर्शनाखाली सपोनि के. डी. पवार, पोउपनि प्रदीप जोगदंड, पोहवा शेख हसन, दादाराव टापरे पो. कॉ. श्याम मोहळे, अतुल बावणे, महीला कर्मचारी अनीता वारघड सर्व पो.स्टे. रामदासपेठ, अकोला यांनी केली.