
“बजेट 2025” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न अकोला दि. 4 फेब्रु. 2025 श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथील अर्थशास्त्र वाणिज्य व सीताबाई महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्प 2025 या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावर भाष्य करण्यासाठी “बजेट 2025” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला महाविद्यालयातील माजी सांख्यिकी विभाग प्रमुख व विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी जेष्ठ सदस्य डॉ संजय खळपकर यांनी बजेट 2025 या विषयावर केंद्रीय अर्थसंकल्पाचे सविस्तर विश्लेषण केले. ह्याप्रसंगी अर्थसंकल्पातील महत्वाच्या आकडेवारीवर उपस्थितांचे लक्ष वेधले. आर्थिक वृद्धी ६.३ ते ६.८ टक्के राहील असे भाकीत केले, जे मागील चार वर्षांपासून ७ टक्केच्या वर असलेल्या आर्थिक वृद्धीपेक्षा कमी आहे. तसेच गुंतवणूक कमी होईल अशी शंका व्यक्त केली गेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करण्याची व्यवस्था सरकारी कारभारात नसल्याने प्रगत तंत्रज्ञानाचा पुरेसा वापर होत नाही असे अहवालात नमूद केले आहे .यंदाचे बजेट ५०.६५ लाख कोटी रुपयांचे आहे. मागील वर्षी ते ४८.२० लाख कोटी रुपयांचे होते.मा. पंतप्रधानांनी ‘लक्ष्मी’ गरीब व मध्यमवर्गीयांवर प्रसन्न होवो ही अपेक्षा व्यक्त केली. त्याप्रमाणे, यंदाचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने नोकरदार व मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा ठरला. अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कर लागणार नाही. तसेच स्टॅंडर्ड डिडक्शन ५० हजार रुपयांहून ७५ हजार रुपये केले. करप्रणातीत मोठ्या प्रमाणात बदल केल्या गेले व प्रस्तावित कर प्रणालीत सात स्तर राहणार आहे. यामुळे सरकारला जवळपास १ लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले. काही अर्थशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे एक लाख कोटी रुपये समजा असंघटित कामगार व शेतकऱ्यांचे उपयोगी आणले असते तर त्यांना अधिक दिलासा मिळाला असता. परंतु या करबचतीमुळे मध्यमवर्ग यांच्या हातात पैसा खेळेल. त्यांची क्रय शक्ती वाढेल. बाजारात वस्तूंची मागणी वाढेल त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन रोजगार निर्मिती पण होईल. एकंदरीत मध्यमवर्गीयांच्या हातात अधिक पैसा खेळेल व त्यामुळे त्यांना बचत, गुंतवणूक आणि आवश्यकतेनुसार खर्च करण्याची मुभा मिळेल.तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा ५० हजार रुपयांहून १ लाख रुपये केल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. मागील काही वर्षापासून मध्यमवर्गीय दुर्लक्षित राहत आहे,असे वाटत असताना, आजच्या अर्थसंकल्पाने मध्यमवर्गीयांच्या माफक अपेक्षा पूर्ण झाल्याने मध्यमवर्गीय सशक्त भारत निर्माण करण्याच्या कार्यात उत्साहाने सहभागी होतील. शिक्षणावरील तरतूद ही 2.6% वरून 6% झाली तर शिक्षणाचा दर्जा सुधारेल असे अभ्यासपूर्ण मत डॉ. संजय खडक्कार यांनी याप्रसंगी मांडले. शेती व्यापार उद्योग शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी बजेट विषय आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात समजावून सांगितला कार्यक्रमाला विज्ञान विभाग प्रमुख डॉ. नितीन मोहोड वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संजय तिडके अर्थशास्त्राचे प्रा. धनंजय काळे मानवविद्याशाखेचे प्रमुख डॉ. एन.टी. वानखडे, सीताबाई कला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रसन्नजीत गवई कला महाविद्यालय मलकापूर येथील प्रा. डॉ. प्रदीप ताकतोडे तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य प्रा. व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक डॉ. धनंजय अमरावतीकर यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्राजक्ता पोहरे तर आभार प्रदर्शन डॉ. मिलिंद तायडे यांनी केले.