कोणत्याही प्रकारचे संकट आले तर आपण नेहमी पोलीसांना मदत मागत असतो अश्या प्रकारच्या मदतीकरिता पुर्ण महाराष्ट्र भर महाराष्ट्र आपातकालीन प्रतिसाद प्रणाली वर काम करणारे डायल ११२ ही यंत्रणा कार्यान्वीत आहे. या आपातकालीन प्रणालीचे मुख्य स्तंभ हे प्रायमरी कॉन्टॅक्ट सेंटर (PCC) हे महापे नवी मुबंई येथे स्थित आहे. जेथुन ७० टक्के कॉल हे पाठविण्यात येतात. व सेकंडरी कॉन्टॅक्ट सेंटर (SCC) हे नागपुर येथे स्थित आहे जेथुन ३० टक्के कॉल पाठविण्यात येतात- अकोला जिल्हाकरिता १ सप्टेंबर २०२१ पासून कार्यान्वीत करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचे संकट
आल्यास आपण ११२ या मदत क्रमांकावर मदत मागु शकता. अकोला जिल्हयामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय वी नचिन इमारत जेल चौक येथे आली आहे. परंतु डायल ११२ सेल हा जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालय येथे होता. त्यामुळे ब-याच अडवणी येत होत्या त्यासुनषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह सा. यांनी पाठपुरावा करून सदरचे डायल ११२ सेल हा नविन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्थानांतरण करून पोलीस नियंत्रण कक्षाचे बाजुला असलेल्या हॉल मध्ये त्याचे नुतनीकरण करून आज रोजी पोलीस अधीक्षक सा. यांचे हस्ते उद्द्घाटन करण्यात आले. आज पासुन डायल ११२ सेल हा आता नविन ईमारतीमध्ये नागरिकांच्या तात्काळ सेवे करीता कार्यान्वीत करण्यात आला आहे.
अकोला जिल्हयामध्ये सदर प्रकल्पाकरिता ३२ चारचाकी व ३० दुचाकी असे एकूण ६२ वाहने आहेत. तसेच नियंत्रण कक्ष अकोला येथे ०२ अधिकारी व ०९ डिस्पेंचर व ०२ MDSL चे तांत्रीक सहाय्यक असुन जिल्हयात एकुण ३१४ पोलीस
अंमलदार यांनी प्रथम प्रतिसादक (ERV) व ११२ वाहनाचे वाहन चालक यांनी प्रशिक्षण घेतले आहे. आजपावेतो डायल १२२ वर एकुण २२०२३ प्राप्त आहेत. डायल ११२ प्रकल्प सुरू झाल्यापासुन आज पर्यंत पिडीतांना मदत पोहचविण्यात अकोला जिल्हा हा सरासरी १७ क्रमांकावर आला आहे. अकोला जिल्हयाचा सरासरी वेळ १२:१२ सेकंद आहे. जिल्हयात एम.डी.टी. द्वारे कॉल पूर्ण करण्याचे प्रमाणे ८१.८ टक्के आहे. जिल्हयाचा प्रतिसादाचे वेळेत सुधारणा होवुन २०२३ ला ०७:४० सेकंद एवढा आहे. प्रतिसाद वेळ ०५ मिनिटांपेक्षा कमी करण्यावर लक्ष आणि तकाखारांच्या तक्रार निवारणावर जलद प्रतिसाद देण्यास प्रयत्नशील असल्याबाबत मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी मत व्यक्त केले,
आज रोजी सदर सेल चे उद्द्घाटन झाले असुन सदर कार्यक्रमाकरिता अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे सा. प्र. उप अधीक्षक गृह श्री. विजय नाफडे, स्था.गु, शा. अकोला प्रमुख श्री. शंकर शेळके, रा. पोनि. श्री जुमनाके तसेच पत्रकार बांधव यांची प्रमुख उपस्थीती होती.

