जिल्हयात अचानक नाकाबंदी.

दि.०३/०३/२०२४ चे रात्री ०२.०० ते ०४.०० पावेतो जिल्हयात वाढत्या मालमत्तेच्या गुन्हयांना आळा बसविण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक, श्री. बच्चनसिंह यांनी अकोला जिल्हयात अचानक नाकाबंदी व कोंबीग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, अकोला, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अकोला व पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा, अकोला व सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी असे एकुण ४२ अधिकारी व २३८ अंमलदार यांनी नमुद कॉम्बींग ऑपरेशन मध्ये सहभाग घेवुन नाकाबंदी व कोम्बीग गरत दरम्यान खालील प्रमाणे प्रभावी कारवाई करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान रिफलेक्टर जॅकेट व टॉर्च घेवुन नाकाबंदी ZIG ZAG स्वरूपाचे बॅरीकेटींग करून तपासलेले प्रत्येक वाहनाचा क्रंमाक व चालकाचे नाव, पत्ता व मोबाईल कंमाक घेवुन दुचाकी ३०६ व चारचाकी २८१ असे एकुण ५८७ वाहने चेक करून त्यापैकी ९५ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करून एकूण ३८९००/-रू दंड आकारण्यात आला आहे. तसेच ६५ निगराणी बदमाश व ४२ माहितीगार गुन्हेगार चेक करण्यात आले आहे. ३) कलम १२२ मपोका प्रमाणे एकुण ०९ कारवाई, ४) कलम १४२ मपोका (तडीपार) प्रमाणे ०१ कारवाई, ५) भारतीय हत्यार कायदयान्वये ०१ कारवाई करण्यात आली. ६) कलम ३३ आर डब्लयु प्रमाणे ०२ केसेस (७) कलम ११०, ११७ मपोका प्रमाणे एकुण २६ केसेस तसेच जिल्हयातील एकुण ६६ हॉटेल लॉजेस व ९५ एटीएम चेक करण्यात आले. नाकाबंदी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी/अंमलदार यांनी सहभाग घेवुन वरील प्रमाणे कलम १४२ मपोका प्रमाणे ०१ तडीपार इसमास अटक केले. व कलम १२२ मपोका प्रमाणे ०१ केस करण्यात आली आहे.

जिल्हयात सतत अशा प्रकारचे कोम्बींग ऑपरेशन व नाकाबंदी चे आयोजन वेळोवेळी करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.