
स्थानिक: अकोला येथील वंचित बहुजन आघडीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे मुख्य प्रबंधक यांना दि. 19/7/2023 रोजी मुंबई जाण्याकरिता व दि. 20/7/2023 रोजी मुंबई वरून अकोला येण्याकरिता विदर्भ एक्सप्रेस, अमरावती अंबा एक्सप्रेस आणि भुसावळ- मुंबई चालणारी पॅसेंजर गाडी ही अकोला पासून एका दिवसाकरिता पॅसेंजर अकोला पासून सुरू करण्यात येण्यासाठी दिले निवेदन.
पावसाळी अधिवेशन मुंबई येथे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये गायरानधारक / शासकीय / महसूल जमिनीवरील अतिक्रमणधारकांचा राज्यव्यापी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाकरिता दि. 19/7/2023 रोजी मुंबई मंत्रालय येथे जाण्याकरिता अकोला जिल्ह्यातील अतिक्रमणधारक शेतकरी हजारो संख्येने मोर्चाकरिता जात आहेत.
दि. 20/7/2023 रोजी संध्याकाळी अकोला येथे परत येणार आहेत. त्यामुळे अकोला रेल्वे स्थानकावरून मुंबई कडे जाणा-या गाड्यांना जसे गोंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेस, अमरावती मुंबई अंबा एक्सप्रेस या गाड्यांना जनरल बोगी जोडण्यात याव्या व भुसावळ -मुंबई चालणारी पॅसेंजर गाडी ही अकोला पासून एका दिवसाच्या जाण्या- येण्या करिता सुरू करण्यात यावी किंवा ती उपलब्ध करण्यात यावी हि अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देवून विनंती करण्यात आली. .

तेव्हा प्रमोद देंडवे (जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अकोला) मिलींद इंगळे (जिल्हा महासचिव) प्रभाताई शिरसाट (जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी अकोला) श्रीकांत घोगरे (जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवक आघाडी अकोला) सौ. शोभाताई शेळके
(जिल्हा महासचिव वंचित बहुजन महिला आघाडी अकोला) गजानन गवई (माजी मनपा गटनेते) ओबीसी नेते ॲड संतोष राहाटे, जि. प. अध्यक्ष संगीताताई आढावू, जि. प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, शिक्षण सभापती मायाताई नाईक, जि. प. सदस्य शंकरराव इंगळे, महेद्र डोंगरे, प्रभाकर अवचार, तालुका कार्याध्यक्ष पवन बुटे, तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, प्रदिप शिरसाट, संदिप आग्रे, धिरज इंगळे,मनोहर बनसोड, देवानंद तायडे, जनार्दन गवई, गजानन दांडगे, सौ. मंदाताई वाकोडे, सुरेश कलोरे, आनंद खंडारे, विश्वास अवचार, हिरासिंग राठोड, दिपक सावंग, अनिल राठोड, श्याम ठाकरे, उज्वला गडलिंग
आदी पदाधिकारी उपस्थित होते.