स्थानिक: अकोला विभागाच्या सर्व राज्य परिवहन महामंडळातुन निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात येते की, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची अकोला विभागाची मासिक सभा दि. ५ जून २०२३ रोजी सोमवारी सकाळी ठीक ९:३० वाजता आगार क्र. २ मधील हनुमान मंदीरात होणार आहे. सभेला अमरावती विभागाचे प्रादेशिक उपाध्यक्ष श्री विजय साबळे, अकोला विभागाचे अध्यक्ष श्री अनिल भंगाळे, हे उपस्थित राहून पेन्शन व बारामाही मोफत प्रवास पास बाबत सविस्तरपणे माहिती देतील. तरी सर्व अकोला विभागांच्या राज्य परिवहन निवृत्त कर्मचार्यांनी वेळेवर न चुकता हजर राहण्याचे आव्हान विभागीय सचिव दिपक वैष्णव यांनी केले. टीप:-ज्या निवृत्त कर्मचार्यांनी संघटनेची सभासद पावती घेतली नसेल त्यांनी सभासद पावतीचै ६००/- ची पावती घेऊन संघटनेला मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले.