
स्थानिक: अकोला
श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे 15 जानेवारी रोजी ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून महाविद्यालयाच्या खाशाबा जाधव इनडोअर हॉल येथे महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू कु. श्रुती बढे हिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात प्रा. डॉ. आशिष राऊत ( IQAC प्रमुख), प्रा. डॉ. नितीन मोहोड (क्रीडा समिती सदस्य),प्रा. संतोष बदणे , प्रा सुशीला मळसणे( कनिष्ठ विभाग प्रमुख, प्रा गोविंद काळे (विज्ञान विभाग प्रमुख), प्रा वि.पी. इंगळे, प्रा. बालाजी रणेर, सर्व विभाग प्रमुख , शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय काळे (क्रीडा विभाग प्रमुख) तर आभार प्रदर्शन श्री नितीन वाघमारे ( क्रीडा शिक्षक) यांनी केली.
प्रतिनिधी: शुभम गोळे