स्थानिक – अकोलाच्या श्री शिवाजी महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा राज्यस्तरीय नियतकालीक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून मा.आमदार अमोल मिटकरी, सदस्य विधान परिषद हे होते. तसेच मा.प्रशांतभाउ देशमुख, सदस्य महाविद्यालय, समिती, मा.पुष्पराज गावंडे, सदस्य महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, मा.डॉ.रावसाहेब काळे, सदस्य मराठी विकास संस्था हे होते. तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे मा.संताष मेकाले, राज्य युवा विभाग प्रमुख, मा.मनिषा जाधव –खिल्लारे, युवा विभाग, मा.अविनाश चव्हाण, हे होते तर प्रमुख उपस्थितामध्ये महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीचे समन्वयक डॉ.किशोर देशमुख, डॉ.उज्वला लांडे, सहसमन्वयक हे होत्या.
पुरस्काराचे स्वरूप ग्रंथ, सन्मानपत्र फ्रेम केलेले, स्व.यशवंतराव चव्हाणांचा पुतळा आणि रोख रक्कम असे होते. प्रतिष्ठानच्या नियमानुसार ज्या संस्थेला पुरस्कार प्राप्त झाला त्या संस्थेमध्ये जाउन तो द्यावा असा आहे. हा पुरस्कार स्वीकारताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट, शिवदर्शन नियतकालिकाचे समन्वयक डॉ.संजय पोहरे आणि प्रमुख पाहूणे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहूण्यांची यथोचित भाषणे झाली. आणि वाचन-लेखन संस्कृतिला प्रोत्साहण मिळावे म्हणून असे कार्यक्रम सातत्याने घेतले जातात. नवीन पिढींसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विविध योजना व फेलोशिपसंबंधी त्यांनी माहिती दिली. तर फुले-शाहू-आंबेडकर-पंजाबराव देशमुख यांचे विचार लोकशाहीला वाचवू शकतात असे भावनिक आवाहन मा.आमदार अमोलदादा मिटकरी यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.श्रध्दा थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.संजय पोहरे यांनी केले. या कार्यक्रमाची सुरूवात स्वागत गीताने झाली तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ.किशोर पुरी, डॉ.नाना वानखडे, डॉ.आशिष राउत, डॉ.संजय शेंडे, डॉ.अविनाश बोर्डे, डॉ.सुलभा खर्चे, डॉ.निलिमा तिडके आदि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता तर बहुसंख्य .विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.