श्री.शिवाजी कॉलेजमध्ये मॅथेमॅटिकल सायन्सेस राज्यस्तरीय सेमिनार स्पर्धा संपन्न

स्थानिक : अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालयात एक दिवशीयमॅथेमॅटिकल सायन्सेस राज्यस्तरीय सेमिनार स्पर्धा घेण्यात आली. याकार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे तर उद्घाटकडॉ. प्रशांत थोरात, श्री शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेज, बाभूळगाव हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. नितीन मोहोड, सेमिनार स्पर्धा समन्वयक तथासायन्स फॅकल्टि हेड, डॉ. आशिष राऊत, आयक्युएसी समन्वयक हे होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन मोहोड यांनी तर संचालन डॉ. उज्जवलालांडे यांनी केले.

Table of Contents

अध्यक्षीय भाषण करत असताना प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे म्हणाले-“अभ्यासक्रमाच्या सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी यामहाविद्यालयात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. मानवी जीवनआहे त्यापेक्षा अधिक सुकर करण्यासाठी त्याच्या उत्थानासाठी संशोधनअसावे “ इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, सांख्यिकी, भूविज्ञान या विषयातील विद्यार्थ्यांनी आपले सेमिनार सादर केले.

इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे परीक्षक म्हणून डॉ. पी. ए. सौदागर, बजाज कॉलेज, वर्धा , प्रा.दत्तराज विद्यासागर , आरएलटी कॉलेज अकोला. संगणकशास्त्राचे परीक्षक म्हणून प्रा. भोयर, अमरावती, डॉ. वाय. एस. रोडे, जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा, प्रा. एल.आर. मुळ्ये, अचलपूर. भौतिकशास्त्राचे परीक्षक म्हणून डॉ. झटाले, अमरावती, डॉ. एस. बी. उन्हाळे , बाळापूर. गणित विषयासाठी परीक्षक म्हणून . ए. एस. निमकरमूर्तिजापूर, डॉ. एस. बी. ताडम, अकोला. सांख्यिकी विषयाचे परीक्षकम्हणून कैलास काळे, बार्शीटाकळी, डॉ. एस. टी. खडक्कर अकोला. भूविज्ञानाचे परीक्षक म्हणून डॉ प्रफुल्ल शिंदे, छत्रपती संभाजीनगर, डॉतेजस पाटील, बार्शीटाकळी, यांनी केले.

समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड.भय्यासाहेबपुसदेकर, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती. प्रमुख पाहूणेमा.बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक, अकोला. डॉ.एच.बी.नवनाले, प्राचार्यडॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम, अकोला. प्राचार्यडॉ.रामेश्वर भिसे, डॉ.आशिष राउत, डॉ.नितीन मोहोड हे होते. यावेळीउपस्थित होते. बच्चनसिंह आपल्या भाषणात म्हणाले-आर्टिफिशियलइंटेलिजन्स (एआय) हे आताच्या काळाचे नवीन संशोधन आहे. तो मानवाच्याहाती आहे. चॅट जिपीटीने संशोधन कार्य सोपे केले आहे. या कार्यक्रमाचेसंचालन डॉ.अनिता दुबे यांनी ता आभार प्रदर्शन डॉ.नितीन मोहोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.गजानन वजीरे, डॉ.बेलखेडकर, डॉ.गणेशगायकवाड, डॉ.संतोष चव्‍हाण, प्रा.रूपाली काळे, डॉ.मिनाक्षी सरोदे आदींनीपरीक्षम घेतले.

इलेक्ट्रॉनिक्स: सेमिनार स्पर्धेत प्रथम क्रमांक महिमा ढगेकर श्री शिवाजीमहाविद्यालय, अकोला व्‍दितीय, रिद्धी मेहरे, आरएलटी कॉलेज, अकोला तृतीय-दिव्या मुऱ्हेकर जी.एस. कॉलेज, खामगाव तर कॉम्पुटर सायंन्समध्ये पहिली-गौरी मानकर, जगदंबा महाविद्यालय, अचलपूर द्वितीय-श्रेया वाणे, गोपाळराव खेडकर महाविद्यालय, तेल्हारा तृतीय -अंजली भिसे, बुरुंगले महाविद्यालय, शेगाव हिने मिळविला. भौतिकशास्त्र प्रथम-भाविका बधे, आर.एल.टी. कॉलेज अकोला, व्‍दितीय -अंबिका अरबट, जे.डी.पाटील सांगलुदकर महाविद्यालय दर्यापूर तृतीय -जाऊ विंचूरकर शिवाजी महाविद्यालय अकोला. गणिताचे विजेते *प्रथम – श्रेया राजू दिकुंडवार शिवाजी महाविद्यालय, अमरावती *दुसरा क्रमांक- जन्नत परवीन शेख आरिफ हुसेन आदर्श सायन्स, जे.बी. आर्ट्सआणि बिर्ला कॉमर्स कॉलेज, धामणगाव रेल्वे तृतीय क्रमांक – गौरी व्ही. लाजुरकर श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला प्रोत्साहणपर- सानिया अंजुम,जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदूर बाजार, सांखिकी विषयात प्रथम विधी पाठक, आएलटी,अकोला.,व्‍दितीय नशरा फातेमा, शिवाजी कॉलेज,अकोला. तृतीय खुशी गुप्ता, अमरावती, भूविज्ञानशास्त्रामध्ये प्रथम क्षीतीज गुप्ता, नागपूर, व्‍दितीय-अर्नव राठोड, शिवाजी कॉलेज,अकोला. तृतीय कल्याणीचौधरी, एम.जी.एम.विद्यापीठ, संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published.