श्री शिवाजी महाविद्यालयात “रेनबो पोस्टर ” सादरीकरण स्पर्धा संपन्न

श्री शिवाजी महाविद्यालय अकोला हे शिक्षणासोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सतत अग्रेसर असते. महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे प्राचार्य डा. आर. एम भिसे यांच्या मार्गदर्शनात दि.21/02/2025 रोजी रेनबो पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली ज्यामधे महाविद्यालयातील विवीध शाखांच्या अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे प्रतीसाद नोंदवून आपले पोस्टर्स सादर केले .स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना “योगा: अ वे ऑफ लाईफ”, “एनव्हायरमेंटल ईश्युज”, “आर्टीफिशीयल इंटेलीजन्स अँड मशिन लर्निग” व ” इथनोग्रफिक इमेजेस ऑफ इंडियन सोसायटी ” हे चार प्रमुख विषय देण्यात आले होते त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी पोस्टर्स तयार करुन त्यांचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले. या स्पर्धेत एम एस सी (कम्प्युटर सायन्स) ची विद्यार्थीनी गायत्री ताथोड हिने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक बि.ए. भाग २ चि विद्यार्थीनी अश्विनी मारोडे , तृतीय क्रमांक बि. कॉम भाग २ ची विद्यार्थीनी मुक्ता ताथोड हीने पटकावीला तर बि.ए. भाग ३ ची विद्यार्थीनी अबोली गलांडे हिला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणुन डॉ संजीव पाटील व प्रा.सुनिता खेकाळे (भिसे) यांनी महत्त्वाची भुमिका पार पाडली. इंग्रजी विभाग प्रमुख डाॕ.पि.पि. देशमुख यांच्या पुढाकारातुन आयोजीत या स्पर्धेचे संयोजक डाॕ.प्रवीण वाघमारे तर प्रा. नम्रता माळी या सहसंयोजक होत्या. डॉ संजय तिडके, डॉ. मोहोड, डॉ आशिष राऊत ,डॉ. बेलसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यानी अभ्यासासोबतच कला गुण जोपासून आपल्या सभोवताली व बाह्य जगातील घडामोडींवर लक्ष ठेवून असावे, कृत्रिम बुद्धिमत्ता येऊ घातली असताना पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे असा संदेश प्राचार्य डॉ भिसे यांनी दिला. डॉ. पि. पि. देशमुख यांनी कौतुक करतांना विद्यार्थिनींची स्पर्धेतील संख्या पाहता उद्याचे युग हे महिलांचे युग असेल व अंगभूत असलेला सर्जनशीलता हा गुण विद्यार्थिनींनी जोपासावा असे सांगितले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डाॕ.अनघा सोमवंशी, प्रा. अर्चना देशमुख , प्रा. आकाश हराळ, प्रा .राहुल सोळंके, प्रा.निशा देशमुख,प्रा. रुतुजा मुर्हेकर यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published.