
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन..
स्थानिक: अकोला येथील
दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघ यांच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अकोल्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक अभिवादन केल्याचे पाहायला मिळाले.
दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघ गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात ज्या माध्यमातून बहुजनांचे विद्यार्थी घडले पाहिजे स्पर्धा परीक्षांची गोडी त्यांना लागून त्यातून अधिकारी निर्माण झाले पाहिजे रेल्वे क्षेत्रामध्ये ते वडले पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघ सातत्याने परिश्रम घेतो आहे त्याचाच एक भाग म्हणून सदर स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

या सस्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार प्रकाश राहुल बोदडे सचिव ऑल इंडिया एससी एसटी असोशियन शाखा अकोला तर्फे रोख रक्कम 5000 रुपये देण्यात आले होते.
तर द्वितीय पुरस्कार रोख रक्कम 3000 रुपये प्रवीण पूंडगे स्टेशन अधीक्षक वाशिम तर्फे हे बक्षीस देण्यात आले होते. तृतीय पुरस्कार
दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी उत्सव समिती अकोला तर्फे रोख रक्कम 2000 रुपये देण्यात आले होते.
तेव्हा स्पर्धा परीक्षा चे विजेते पद प्रथम दीपक गणेश माजरे, द्वितीय सौरभ रमेश भगत तर
तृतीय भाग्यश्री भैय्यावार यांनी पटकाविले.
तेव्हा दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे
सुमित लक्ष्मणराव वंडकार, मुकेश डोंगरे, सुरज गजभिये, सोनल शामराव उके, नितेश गेडाम, सिद्धार्थ रामटेके, अरविंद सवाई, गणेश वाणी, अमर नंदागवळी, राहुल सांगोळे, राहुल मोरे, नंदकिशोर गायकवाड, संदीप देवकर, प्रकाश लांडे, धनंजय पुंडगे, अंकुश रंगारी, अजय जारवाल, पवन पवार, कौस्तुभ बागडे, आकाश गोंडाने, संदीप कांबळे, बादल चव्हाण, कृष्णा देवांगन, राजेश देशमुख, रुपेश पंचबुद्धे, आशिष वाकोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.