सामाजिक कार्यकर्ते भारत भाऊ मेश्राम यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्त मूकबधीर विद्यालय मलकापूर येथे भोजन दान कार्यक्रमाचे आयोजन…

स्थानिक: अकोला तारफैल येथील रहवासी सामाजिक कार्यकर्ते भारत भाऊ मेश्राम यांचा ४ एप्रिल रोजी पुण्यतिथी निमित्त कोणताही पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम न राबविता. सामाजिक कार्य करून त्यांना आदरांजली देण्यात आली. भरत भाऊ मेश्राम हे एक सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी अविरत समाजाची सेवा करण्याचे काम केलं आणि प्रत्येकाची सहाय्यता करत अनेकांच्या अडचणी आणि दुःखद चे सहभागी होत. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या परिवारातील सदस्य यांनी हा वारसा पुढे नेण्याचं काम केले आहे.

तेव्हा याप्रसंगी खुरेंद्र तिडके (समाज कल्याण निरीक्षक) प्रा.राजेंद्र डोंगरे, रवींद्र डोंगरे, वनिताताई मेश्राम, यशोधरा डोंगरे, सरला डोंगरे, इंदू खोब्रागडे, शोभा कुंभलवार, अभिजीत डोंगरे, आशिष मेश्राम, सनी डोंगरे, कुणाल डोंगरे आणि मेश्राम व डोंगरे परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.