
स्थानिक : अकोला येथील मुळगाव तालुका दिग्रस खुर्द तालुका पातुर जिल्हा अकोला येथे गरीब घराण्यात जन्म झाला. जिल्हा परीषद प्राथमीक शाळेत वर्ग १-४ पर्यंतचे ग्रामीण भागात शिक्षण झाले. नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह बाळापुर येथे राहून जिल्हा परीषद प्रामाणिक हायस्कुल बाळापूर येथे ८ ते १० पर्वतचे शिक्षण घेतले. नंतर ज्युनियर कॉलेजचे शिक्षण डॉ. एच.एन. सिन्हा कॉलेज पातूर येथे सायकलने प्रवास करून शिक्षण घेतले व १२ वी पास झाले.
पुढील शिक्षनात कोणतेही मार्गदर्शन न मिळाल्याने एकतर डी.एड करणे कींवा पोलीस मध्ये भर्ती होने ह्या दोन गोष्टींचा विचार मनात आला. परंतु २ वर्षाचे डी. ए प्रशिक्षण घेलल्यावर पुन्हा नौकरीसाठी थांबावे लागले व नोकरीसाठी कुणी शिफारस करू शकणार नाही तसेच शिक्षकांच्या जागा कमी असल्यास लवकर नौकरी लागणार नाही म्हणून पोलीसची नौकरी स्वता:चे मेहनतीने गॅरंटीने लागू शकते. असा विचार पक्का केला व पोलीस भर्तीची तयारी केली मला पहील्याच प्रयत्नात यश आले आणि एस सी कोट्यातून पहील्या १० मध्ये पोलीस मध्ये ३/१०/१९९१ निवड झाली व पोलिस खात्यात रुजु झालो.
पोलिस प्रशिक्षण केंद्र (ट्रेनींग सेटर) जालना येथे सुरु झाले. प्रशिक्षण सुरु असतांना प्रत्येक काम मेहनतीने व इमानदारीने करीत असल्याने ट्रेनिंग सेंटर मधील ६०० प्रशिक्षणार्थी मधून पोलीस ट्रेनिंग सेंटर मधून प्राचार्य, श्री. भेजगे यांचा आदर्श व विश्वासू प्रशिक्षणार्थी म्हणुन ओळखल्या गेलो. तसेच ट्रेनिग सेंटरचे कवायतीचे (परेडचे) मुख्य -अधीकारी यांचा सुद्धा क्रमांक एकचा प्रशिक्षणार्थी म्हणून ओळखला गेलो. ट्रेनिंग संपल्यानंतर पहिली पोस्टिंग पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे मिळाली. तेथे कार्यरत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगीतल की, आपल्या कमाईचा २० वा हिस्सा समाजासाठी खर्च करावा परंतु आर्थिक परिस्थिती सुधारलेली नसल्याने समाजासाठी २०वा हिस्सा खर्च करू शकलो नाही पण समाजातील इसम हे आर्थीक अडचणीमुळे नाईलाजास्तव अवैध धंद्यात अडकले असल्याने लक्षात आले. नंतर बिट मध्ये काम करीत असतांना अशा इसमांना सहकार्य करून काही दिवस पाठबळ देवुन त्यांच्याकडून कोणतेही भेट वस्तु न स्वीकारता त्यांची परीस्थीती सुधारल्यावर त्यांना अवैध धंद्यातून बाहेर काढून अवैध धंदा बंद करून त्यांना इतर व्यवसाय करण्याचे मार्गदर्शन केले आज ते चांगल्या प्रकारे व्यापारी (भाडे) बनले तर कोणी रेडीमेड कपड्याचे व्यापारी बनले आहेत. त्याच प्रकारे समाजातील दुर्बल इसमांना बरेच वेळा सहकार्य वेले आहे व मनापासून मदत केली आहे.
आज पर्यंत एकुन ३४ वर्षाची सेवा पाहता सुरुवातीपासूनच १६ वर्ष रायटर म्हणून काम केले. उर्वरित 17 वर्ष पी आय रायटर म्हणून काम केले. आज रोजी ACB अकोला येथे नियुक्ती होऊन DYSP यांचे रायटर म्हणून काम करीत असतांना PSI म्हणून प्रमोशन मिळाले.
नौकरीचे काळत आई वडीलांची चांगल्या प्रकारे सेवा करता आली. तसेच १ मुलगा व १ मुलगी असे दोन अपत्य असुन मुलगा MBBS पूर्व परीक्षेची तयारी करीत आहे व मुलगी पुनम ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद (संभाजीनगर) येथे PHD चे शिक्षण घेत आहे.
या सर्व कार्य प्रणाली मध्ये पत्नी सौ. प्रिती इंगळे यांनी सर्व परीस्थीतीवर मात करून चांगल्या प्रकारे साथ दिली त्यामुळे मी आज रोजी यशस्वी झालो आहे.