श्रीकृष्ण राऊत यांची ‘ उभी जिन्दगानी’ सं.गा.बा.अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

ख्यातनाम गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची ‘उभी जिन्दगानी’ ही गझल सं.गा.बा.अमरावती विद्यापीठात २०२३ ह्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. भाग २ च्या आवश्यक मराठीसाठी नेमलेल्या
‘शब्दगंध ‘ ह्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.

ह्या पूर्वी २०१७ ला त्यांची ‘दिंडी ‘ ही गझल सं. गा. बा. अमरावती विद्यापीठाच्या बी.एस्स.सी भाग १च्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली होती.२०१३ ला श्रीकृष्ण राऊत यांची ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर’ ही कविता रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या बी. एस्सी. भाग १ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली होती.
२०१२ ला ११ वी च्या अभ्यासक्रमात त्यांची ‘वीज’ ही गझल लागली.
आणि त्याचवर्षी सं.गा.बा अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. भाग २ च्या अभ्यासक्रमात त्यांची ‘मुकुट’ ही कविता अभ्यासक्रमात अंतर्भूत झाली.
२००१ ते २०१२ या काळात सं.गा.बा. अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमात त्यांची ‘जो जो रे बाळा’ ही कविता अभ्यासक्रमात नेमलेली होती.

एक नामवंत कवी, गझलकार म्हणून श्रीकृष्ण राऊत यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला’, ‘गुलाल आणि इतर गझला’,’ कारुण्य माणसाला संतत्व दान देते ‘ गझलाई’ ,’तुको बादशहा’, ‘मेळघाटच्या कविता ‘ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे.’माझी गझल मराठी’ ह्या त्यांच्या ब्लाॅगची इंटरनेटवर १,४४,००० हून अधिक पृष्ठे जगभर वाचली गेली आहेत.त्यांना साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती मिळाली आहे.

गझलगंधर्व सुधाकर कदम,गझलनवाझ भीमराव पांचाळे, हिन्दी मराठी चित्रपटाचे प्रख्यात संगीतकार दिनेश अर्जुना यांच्यासह अनेक नामवंत गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत.’राघूमैना’,’तू तिथे असावे’ ‘टेक इट इझी ‘ ह्या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेले आहे.डाॅ.पंजाबराव देशमुख यांच्याजीवनावर आधारित ‘ज्ञानगंगेचा भगीरथ’ ह्या चित्रपटाची पटकथा,संवाद आणि गीतलेखन श्रीकृष्ण राऊत यांनी केले आहे. आशा भोसले, सुरेश वाडकर,उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, स्वप्नील बांदोडकर,वैशाली माडे इ.प्रख्यात गायकांनी त्यांच्या रचना गायिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.