धर्म हा नैतिक व सामाजिक असतो बाह्य पोषाख म्हणजे धर्म नव्हे – डॉ.रमेश अंधारे
स्थानिक – अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मा. प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांच्या मार्गदर्शनात दिनांक १० ते १४ एप्रिल २०२३ दरम्यान ‘समता पर्व’ चे विविध व्याख्यान व स्पर्धेसह आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख वक्ते म्हणून डॉ.रमेश अंधारे, कथा-कादंबरीकार, साहित्यिक तथा माजी प्राचार्य श्री शिवाजी महाविद्यालय, अमरावती हे होते. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले – ‘‘डॉ.भाऊसाहेबांच्या तत्वविचाराला समजून घ्यावयाचे झाल्यास भारतीय श्रमन व वैदिक परंपरेला समजून घ्यावे लागते. आणि तेव्हा आपण भाउसाहेबांच्या तत्वविचाराचा व कार्याचा काही भाग समजून घेउ शकतो.’’ असे त्यांनी अवैदिक परंपरेतील विविध ग्रंथाचा उल्लेख करीत अनेक प्राच्य विद्वानांचे विचार मांडले ज्यामध्ये उद्वाहू वामन , चार्वाक , भुरीदत , अश्वघोष , बुध्दा पासून ते थेट डॉ.पंजाबराव देशमुख यांच्यापर्यंत चालत आलेला विचार आपल्या तत्वचिंतक शैलीतून मांडला. यावेळी भाउसाहेबांचे अभिवादन गीत डॉ.सोपान वतारे व संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मा.राजाभाउ देशमुख, आजिवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, मा.अशोक देशमुख, शाळा समिती सदस्य हे प्रामुख्याने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.किशोर देशमुख, सहसमन्वयक डॉ.उज्वला लांडे ह्या मंचावर उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरूवात महाविद्यालयाच्या परिसरातील डॉ.भाउसाहेब देशमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण डॉ.रमेश अंधारे यांच्या हस्ते करून झाली तर मा.राजाभाउ देशमुख यांनी संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण केले.
यावेळी उपस्थित प्राचार्य डॉ.अंबादास कुलट आणि मान्यवरांनी भाउसाहेबांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. राजाभाउ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये १३२ विद्यार्थ्यांनी १३२ बॉटल रक्तदान करून महापुरूषांना आगळे-वेगळे अभिवादन केले. पाहूण्यांचा परिचय डॉ.चेतन राउत यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ.अनिता दुबे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ.संजय पोहरे, डॉ.नाना वानखडे, डॉ.जीवन पवार, डॉ.आशिष राऊत, डॉ.किशोर पुरी बहुसंख्य प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहिल इंगळे, प्राजंल सदार, रोहित पवार, तुषार अवचार, गौरव फाले, जय शुक्ला, रितेश गावंडे आदींनी परिश्रम घेतले.