
लॉक युवर आयडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे सोबत सामंजस्य करार (एम ओ यु)
स्थानिक : अकोला श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला आय क्यू ए सी.आणि आर आर सी तर्फे बौद्धिक संपदा कार्यशाळा संपन्न.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे प्रमुख मार्गदर्शक ॲड. योगिता पडोळे नोंदणीकृत पेटंट एजंट,संचालक, लॉक युरिडिया प्रा. लिमिटेड पुणे. प्रमुख उपस्थिती आय क्यू ए सी समनव्यक डॉ आशिष राऊत,गृहविज्ञान प्रमुख डॉ अंजली कावरे आर आर सी समनव्यक डॉ दीपक कोचे उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक ॲड. योगिता पडोळे यांनी कार्यशाळेला उपस्थित प्राध्यापक संशोधक विद्यार्थी यांना पेटंट नोंदणी कशी करावी,व व्यवसाय पेटंट बद्दल माहिती दिली या मध्ये कॉपी राईट पद्धती व त्याबद्दल असलेला अधिकार व कायदा असे विविध प्रकारावर माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ रामेश्वर भिसे यांनी आपल्या भाषणात पेटंट करणे का आवश्यक आहे या बद्दल माहिती दिली. व आपण सर्वांनी एक तरी पेटंट करून घ्यावे व एक दिवशीय कार्यशाळेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. समारोपीय कार्यक्रमात लॉक युवर आयडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे सोबत सामंजस्य करार (एम ओ यु) करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ आशीष राऊत यांनी केले संचालन डॉ गणेश गायकवाड तर आभार डॉ दीपक कोचे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. संजय तिडके डॉ. नाना वानखडे, डॉ. पी.पी देशमुख डॉ समिधा कडू, डॉ. रणजित भंडागे, डॉ. मिलिंद बेलखेडकर, डॉ. मीनाक्षी सरोदे,डॉ.स्वाती झोडपे प्रा.संजय काळे, डॉ धनंजय काळे, व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता प्रा शुभम राठोड, प्रा गोपाल ढोबळे प्रा ज्ञानेश्वर शेळके रोहन बुंदेले यांनी परिश्रम घेतले.

