श्री शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस प्लेसमेंट मध्ये निवड

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या एम एससी जिओ इन्फॉर्मेटिक्स विषयाच्या विद्यार्थ्यांचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली कॅम्पस प्लेसमेंट देण्याची परंपरा कायम राखत या वर्षी सुद्धा पासआउट होणाऱ्या बॅच करता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिओलॉजी व जिओ इन्फॉर्मेटिक्स विभाग प्रमुख डॉ. गणेश गायकवाड यांनी महाविद्यालयात जिओ इन्फॉर्मेटिक्स च्या विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन केले होते. जॉब कॅम्पस प्लेसमेंट मध्ये 17 विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये पवन इंगळे, अंबरीश जलामकर, अर्चना गोळे श्रेयश ब्राह्मणकर, वैष्णवी राणे, वैष्णवी चतार,भारती महल्ले, चिन्मय पारखी, श्रीकांत तुळसकर, मोहनीश रणदिवे, मानसी कुलकर्णी, समृद्धी सोळंके, सुकन्या यादव, हर्षा थंडेवार यांची नियाल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, देहारादून येथील कंपनीमध्ये सिलेक्शन झाले हे सर्व जीनेसिस इंटरनॅशनल लिमिटेड, मुंबई सोबत गुगल तसेच विविध प्रकारचे रोड नेटवर्किंग, टॉवर मार्किंग लेआउट सिलेक्शन, ई.सारख्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. तर झैद इमरान अहमद यांचे नारायणा एज्युकेशन, हैदराबाद येथे तर सेजल इंगळेचे बी जिआयस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक येथे तर भावीन लाखे याची हैदराबाद येथे जीआयएस डेव्हलपर कोर्स करिता निवड झाली. या सर्व नियुक्तीयांबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे कार्यकारिणी सदस्य श्री हेमंतदादा काळमेघ, अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.प्रवीणजी रघुवंशी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा.सुरेश राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, आय.क्यू.ए.सी., समन्वयक डॉ.आशिष राऊत, विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ.नितीन मोहोड, डॉ.दीपक कोचे, प्रा. पवन गिरी, प्रा. प्रणय पाली, प्रा. पियुष सरनाईक तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.