
अकोला:- श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आय क्यू ए सी, हेल्थ डिपार्टमेंट, जीव रसायनशास्त्र विभाग आणि माधवबाग कार्डियाक केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12/01/2023 रोजी राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त ” हृदयरोग व मधुमेह बाबत जनजागृती ” आणि स्वास्थ्य तपासणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळा वसंत सभागृह येथे संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत व्यासपीठावर डॉ. कल्याणी बेलोकार ( संचालक माधवबाग क्लिनिक अकोला, सायन्स फॅकल्टी इन्चार्ज डॉ. संजय शेंडे, आय क्यू ए सी इन्चार्ज डॉ. आशिष राऊत, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्वाती झोडपे तसेच जीव रसायनशास्त्र विभाग प्रमुख व हेल्थ सेंटर इन्चार्ज प्राध्यापक संजीव पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक रवि दाभाडे यांनी केले. कार्यशाळेच्या सुरुवातीला प्राध्यापक संजीव पाटील यांनी प्रास्ताविक केले. हृदयरोग व मधुमेह या आजाराविषयी त्यांनी सविस्तर भाष्य केले. त्यानंतर डॉक्टर कल्याणी बेलोकार यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे हृदयरोग व मधुमेह या आजारांवर माधवबाग मध्ये कुठल्या कुठल्या उपचार पद्धती केल्या जातात व आयुर्वेद आणि आधुनिक उपचार पद्धती यांचे सांगड घालून कशाप्रकारे रुग्णांना या उपचार व द्वारे रोगमुक्त केले जाते यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर माननीय प्राचार्य डॉक्टर ए एल कुलट सर यांनी उपचारापेक्षा प्रतिबंध कसा चांगला आहे याविषयी मार्गदर्शन केले.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन माननीय प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य शिबिरासाठी 115 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या नावाचे नोंदणी केली होती. त्यातील 95 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली कर्मचाऱ्यांचा ईसीजी काढण्यात आल. त्यांची रँडम शुगर ब्लड प्रेशर, हाईट, वेट BMI तपासणी करण्यात आली व त्यांना त्यासंबंधी मार्गदर्शन करून औषधी देण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लेफ्टनंट डॉक्टर अश्विनी बलोदे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक सचिन भुतेकर, श्री अजय मेढे, श्री हेमंत कावटकर, जागृती भातकुलकर, कृष्णा सुलताने, लीना वानखडे व सर्व एमएससी बायोकेमिस्ट्री विषयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.