श्री शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्याची मानसोपचार रुग्णालयाला भेट.

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह’अकोला : शिवाजी महाविद्यालय, येथील मानसशास्त्र विभागाचे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी ‘जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह’ निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट यांच्या मार्गदर्शनात अकोल्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.सुजय पाटील यांच्या मानसिक रूग्ण्यालयात भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून डॉ.चेतन राऊत व डॉ. संतोष पस्तापुरे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३०विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला व वेगवेगळया प्रकारच्या मानसिक आजारग्रस्त रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून आजाराबद्दल माहिती जाणुन घेतली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.सुजय पाटील मानसोपचार तज्ञ यांनी मानसिक आजार जनजागृती ही एक आजच्या काळाची गरज असून ती गरज पूर्ण करण्याचे काम व मानसिक आजारग्रस्त व्यक्तींना समजून घेऊन सहानुभूतीपूर्वक आधार देण्याचे काम औषधोपचार व समुपदेशन याच्या माध्यमातून केला जाते. समुपदेशक हा या क्षेत्रामधला महत्त्वाचा घटक मानला जातो आणि आजच्या आधुनिक काळात अनेक मानसिक समस्या उद्भवलेल्या असून त्या समस्यांची सोडवणूक करण्याचे काम मानसशास्त्राच्या अभ्यासाक करू शकतात असे मत मांडले. डॉ.सुजय पाटील हे अकोल्यातले सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ असून अगदी माफक दरात रुग्ण सेवा करण्याचे काम जवळपास 25 ते 30 वर्षापासून अविरत करित आहेत.

यावेळी मानसशास्त्र विषयाचे शशिकांत सदांशिव,तुषार चव्हाण , एकता शिरसाट, अजय वैराळे,विशाल गोलाईत,तुषार चव्हाण, सोमेश अवचार, कांचन अवचार, अरविंद अंभोरे, वैभव आगलावे, वैष्णवी काकडे,निशा हिवराळे, हर्षाली काकडे,जरीना शेख, महक, मोहम्मद समी, शेख तालीब हुसेन,रिंकू मेश्राम, तृप्ती बिहाडे, श्रुती बुडाखले, श्रेया फाले, दर्शना रत्नपारखी, प्रमोद सातव, विकास चव्हान, आदित्य वहिले, विट्ठल,पूजा खिल्लारे, कल्पना तिखिले, जोत्सना, प्रणव तायडे, समुद्रे, इत्यादी विदयार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.