श्री शिवाजी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

स्थानिक /अकोला. श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अकोला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाला इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.पी.पी.देशमुख,मराठी विभाग प्रमुख डॉ संजय पोहरे, वाणिज्य विभागाचे डॉ.सविता निश्चित डॉ संगीता शेगोकार,डॉ अविनाश पवार,प्रा सचिन भुतेकर,प्रा सुनिल मावसकर,प्रा.मयुरी गुधडे,प्रा पल्लवी ठाकरे, उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची पूजन करण्यात आले.प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे यांच्या हस्ते काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला बद्दल कु संचिता चव्हाण हिचा सत्कार करण्यात आला.

प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे यांनी महिलांन प्रती केलेल्या कार्याची माहिती उपस्थिती सर्वांना दिली कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता रोहन बुंदेले संजय राऊत , अनिल शेगावकर हेमंत कवटकर, तायडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.