श्री शिवाजी महाविद्यालयात डोळ्याच्या साथीवर मोफत तपासणी व उपचार शिबिर


 
९ ऑगस्ट २०२३ रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून भूगोल विभाग,मानसशास्त्र विभाग व म.गांधी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डोळ्याच्या साथीच्या आजारावर एक दिवसीय मोफत तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाला माहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट तर सुप्रसिद्ध डॉ.प्रवीण अग्रवाल (एम.डी. होमिओपॅथी), डॉ.चेतन राउत, भूगोल विभाग प्रमुख, डॉ. संजय शेंडे, डॉ. आशिष राउत, प्रा.संतोष पस्तापुरे, डॉ.संजय पोहरे, डॉ. संजय तिडके, डॉ. नानासाहेब वानखडे, डॉ. दिपक वानखडे, व डॉ.प्रवीण अग्रवाल यांची डॉक्टरांची संपूर्ण टिम, त्यामध्ये मनिषा यादव, श्रध्दा मोडक, राखी समर्थ, सुप्रिया दामोदर यांचे योगदान लाभले.


या शिबिरामध्ये अंदाजे 250 विद्यार्थ्यांनी व 85 प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी डॉ. अग्रवाल यांचे सामाजिक दायित्वासाठी सदा अग्रेसर राहण्याच्या सामाजिक जाणिवेचे मनापासून अभिनंदन केले. आणि अशा सामाजिक उपक्रमात यापुढेही आपल्या सहकार्याची अपेक्षा व्‍यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चेतन राउत सरांनी केले तर संचालन व आभार प्रा. संतोष पस्तापुरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार चव्‍हाण, श्रेया फाले, हृचिका सरदार, अभिलाष बडगे, शुभम गोळे, सनी उपर्वट, अभी उमेकर, प्रतिक सुरवाडे, रोहित पवार, सुमेध कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.