अकोला – क्रीडा व युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 22 ते 27 नोव्हेंबर 2024 दरम्यान करण्यात आले.
सदर राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे या वयोगटात शाह बाबू जूनियर कॉलेज पातुर येथे इयत्ता 12वीं मध्ये शिकत असलेला खेळाडू शोएब गाडेकर ने सलग दुस-या वर्षीही आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत राज्यातुन प्रथम स्थान पटकावत स्वर्ण पदक प्राप्त केले व दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बाँक्सिग स्पर्धेत तो महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधित्व करणार आहे त्याच्या या यशाबद्ल संस्थेचे सिईओ इसहाक राही, शारिरीक शिक्षण निदेशक फिरोज अंन्सारी,यांनी अभिनंदन केले असुन शोएब गाडेकर हा जिल्हा क्रीड़ा अधिकारी तथा बॉक्सिंगचे राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीश चंद्र भट्ट, सहायक क्रीडा प्रशिक्षक गजानन कबीर, आदित्य मने आदिंच्या मार्गदर्शनात नियमित प्रशिक्षण घेत आहे त्याच्या हा यशाबद्ल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे