
मिरवणुकी मध्ये पारंपारिक लोकनृत्य सादर
अकोला : दि : 10 मार्च रोजी शिवतीर्थ शिवाजीनगर पातूर येथे शिवजयंती निमित्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात व महाराजांच्या जयघोषात साजरा करण्यात आला.या जयंती उत्सवात बाळराजांना पाळण्यात घालून शिवाजीनगर स्थित महिलांनी पाळणा गीते सादर केली.तर उदय गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडे सादर करून आई तुळजाभवानी च्या नावाने गोंधळ करून या जन्मोत्सवाचा उत्साह वाढवला या जन्मोत्सवा दरम्यान महिला व मुलींनी पारंपारिक नृत्य सादर करून बघायचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी श्री खडकेश्वर व्यायाम शाळा पातुर ची दिगंबर उगले व श्रीकृष्ण फुलारी यांनी आपल्या व्यायाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने 600 साहसी प्रात्यक्षिके सादर केली.लहान मुलांनी लेझीम व झेंडा नृत्य सादर केली.यावेळी सार्वजनिक छत्रपती शिव जयंती उत्सव पातूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारका पासून मिरवणूकी ला सुरवात करण्यात आली.
मिवणुकी मध्ये वारकरी सांप्रदाय व श्री छत्रपती शिवाजी महाराज वेशभुषा,बँड पथक पारंपारिक वाद्य यामुळे मिरवणुकीची शोभा वाढली होती. संपूर्ण मिरवणूक सोहळ्या मध्ये पातूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा. हरिष गवळी, उपनिरीक्षक मा.हर्षल रत्नपारखी, उपनिरीक्षक मा.गजानन पोटे, सहाय्यक पोलीस मीरा सोनुने यांचा मिरवणूकी मध्ये कडक व चोख बंदोबस्त होता.तसेच पो.कॉ.निलेश राठोड, विकास जाधव, श्रीधर पाटील,भवाने मेजर,राठोड मेजर,असोलकर, पोलीस कर्मचारी, महिला होमगार्ड आदी पोलीस यंत्रणा बंदोबस्ता करिता मोठया प्रमाणात सज्ज होत्या. यावेळी पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत युवा समिती चे सदस्य अविनाश पोहरे, पवन सुरवाडे, करण राठोड, किरण निमकंडे, रामेश्वर वाढी,निखिल उपर्वट, तुषार शिरसाठ,आदींचे सहकार्य लाभले.छ.शिवाजी महाराज यांची वेशभुषा धारण करून सुरज क्षीरसागर व नील देवकर हे मिरवणुकीचे लक्ष ठरले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मिवणुक कार्यक्रम यशस्वी रित्या वेळेच्या आत शांततेत पार पडला.