शिवाजीचा यश इंगळे दिल्ली प्रजासत्ताक पथसंचालनासाठी निवड

अकोला -श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील ज्युनिअर अंडर ऑफिसर व 11 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. चे कॅडेट यश इंगळे यांची प्रजासत्ताक पथसंचलन नवी दिल्ली 2024 करिता निवड झाली आहे.
दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन परेड करीता राष्ट्रीय छात्र सेनेमधून उत्कृष्ट ड्रिल असणाऱ्या उमद्या कॅडेटची निवड बटालियन ग्रुप व राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीपर्यंत वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून होत असते. 2024 च्या पथसंचलनाकरिता सप्टेंबर पासून तर जानेवारीपर्यंत ऐकून 110 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करून यश इंगळे यांनी दिल्लीच्या प्रजासत्ताक पथसंचालनाची मजल गाठली 11 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल् चंद्रप्रकाश भदोला व श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी यश इंगळे यांच्या आई-वडिलांचा यशोचित सत्कार महाविद्यालयात केला आहे.
ह्यावेळी महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटचे एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन डॉक्टर आनंदा काळे व लेफ्टनंट अश्विनी बलोदे व एन.सी.सी. चे सर्व कॅडेट उपस्थित होते. रिपब्लिक डे परेड करिता निवड झालेला बटालियनचा हा एकमेव कॅडेट आहे. होली क्रॉस कॉन्व्हेंट मधील आरोही ही जे.डब्ल्यू. गटांमधून निवड झालेली आहे तर यश इंगळे याची सीनियर डिव्हिजन बॉईज मधून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे फ्लेक्स महाविद्यालयाच्या परिसरात झडकत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.