
स्थानिक: अकोला
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय अकोला ची खेळाडू कु. श्रुती गणेश बढे हिने 68 वी शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा 2024-25 भोपाल येथे महाराष्ट्र संघाकडून 19 वर्षांखालील गटात वैयक्तिक सुवर्णपदक आणि सांघिक सुवर्णपदक प्राप्त केले.

त्या बद्दल महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, श्री राजेश गीते प्रबंधक, प्रा. सुशीला मळसणे कनिष्ठ विभाग प्रमुख,प्रा. संजय काळे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. नितीन वाघमारे क्रीडा शिक्षक , श्री विन्सेंट आमेर रायफल शूटिंग प्रशिक्षक तसेच सर्व महाविद्यालयाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.