शिवाजी महाविद्यालयात जागतिक अंधदिनानिमित्त प्रा विशाल कोरडे यांचे व्याख्यान संपन्न


अकोला :स्थानिक श्री शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाद्वारा जागतिक अंध दिन आणि वाचन प्रेरणा दिन दि. 15/10/2022 रोजी साजरा करण्यात आला . या प्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ.अर्चना पोटे , प्रमुख वक्ते म्हणून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे अध्यक्ष व संगित विभागाचे सहाय्यक प्रा.विशाल कोरडे तर प्रमुख अतिथी म्हणून कला विभागातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक श्री . अशोक नांदूरकर व ज्योती ढोले उपस्थित होते . प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्रास्ताविकात प्रा शिल्पा शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे औचित्य स्पष्ट केले . आपल्या व्याख्यानात प्रा.विशाल कोरडे यांनी दिव्यांग शिक्षणातल्या अडचणी ,उपाययोजना ,पांढरी काठीचे महत्त्व व ब्रेल लिपी प्रशिक्षण या विषयावर प्रात्यक्षिकासह चर्चा केली . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे अंध विद्यार्थी धीरज ढोले व आकांक्षा नांदुरकर यांचे शैक्षणिक पालकत्व प्रा.कोरडे यांनी स्वीकारले . दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांनी तयार केलेले आयुर्वेदिक सुगंधी उटणे सर्वांनी खरेदी करावे असे आव्हान त्यांनी केले . कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका समाजशास्त्र विषयाच्या रंजिता फुटाणे यांनी पूर्ण केली .कार्यक्रमाचे संचालन वर्ग १२ वी ची विद्यार्थीनी शिवानी पाचपोर ,आभार प्रदर्शन वर्ग ११वी ची विद्यार्थीनी नंदिनी सदांनशीव हिने तर यशस्वी आयोजनासाठी प्रा.कोरपे ,प्रा.दंदे ,प्रा .शिंदे आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published.